सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पाचव्या कुलगुरूपदी प्रा.डॉ. प्रकाश अण्णा महानवर यांची राज्यपाल रमेश बैस यांनी नियुक्ती केली आहे.
सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ मृणाली फडणवीस या मी २०२३ मध्ये सेवानिवृत्त झाल्या होत्या. रिक्त झालेल्या पदासाठी राज्यपाल भावना मार्फत निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार कुलगुरू पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. १६ व १७ सप्टेंबर रोजी मुंबई विद्यापीठामध्ये सुमारे ३१ उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या होत्या. त्यापैकी पाच जणांची निवड राज्यपाल भवन समितीमार्फत करण्यात आली होती. पाच जणांची नावे अंतिम निवडीसाठी राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्याकडे पाठवण्यात आले होते.
राज्यपालांनी पाच जणांची मुलाखत घेऊन, त्यातील प्रा. डॉ.प्रकाश अण्णा महानवर यांची सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केल्याच शनिवारी जाहीर करण्यात आले आहे. डॉ. प्रकाश अण्णा महानवर हे मुंबई विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ डिस्टन्स अँड ओपन लर्निंग या विभागात सीनियर प्रोफेसर व डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. ते सातारा जिल्ह्यातील मान-खटाव तालुक्यातील दहिवडी येथील मूळचे रहिवासी असल्याचे समजते. पुढील आठवड्यात ते सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार घेतील असे समजते.