आयएमए संघटनेच्या राज्याच्या जनसंपर्क अभियान व कोरोना काळातील डॉक्टरांची भूमिका याविषयी जनजागृती करण्यासाठी लोंढे बुधवारी बार्शीत आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघटनेेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. संतोष कुलकर्णी, बार्शीचे अध्यक्ष डॉ. प्रशांत मोहिरे, डॉ.बी. वाय. यादव, डॉ. संजय अंधारे, डॉ. राम जगताप, डॉ. लक्ष्मीकांत काबरा, डॉ.योगेश सोमाणी, डॉ.गणेशकुमार सातपुते, डॉ. तरंग शहा, डॉ. विवेकानंद जानराव, डॉ. महादेव कोरसाळे उपस्थित होते.
लोंढ म्हणाले, देशपातळीवर डॉक्टरांसाठी काम करणारी राष्ट्रीय संघटना असून, राज्यात संघटनेचे ४६ हजार सभासद व २२० शाखा कार्यरत आहेत. संघटनेच्या वतीने राज्य शासनाकडे कोरोना काळात डॉक्टरांच्या निधनापश्चात ५० लाखांचे कोरोना कवच देण्याची मागणी लावून धरली आहे. देशात बिहार, पश्चिम बंगाल, ओरिसा या राज्यात २५ लाख रुपयांचे कोरोना कवच डॉक्टरांसाठी मंजूर केले. या धर्तीवर राज्यातही संघटनेच्या वतीने किमान १० लाख रुपयांचे तातडीने कोरोना कवच देण्याचा विचार सुरू आहे.
----
संजय अंधारे यांना राष्ट्रीय कोरोना योद्धा पुरस्कार
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्याच लाटेत कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी डेडिकेटेड हेल्थ सेंटर सुरू करणारे बार्शीचे डॉ. संजय अंधारे यांना कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रीय कोरोना योद्धा म्हणून आयएमए संघटनेच्या राज्य शाखेच्या वतीने निवड करण्यात आल्याची माहिती डॉ. लोंढे यांनी दिली. पुणे विभागातून या पुरस्कारासाठी निवड झालेले ते एकमेव डॉक्टर आहेत.
----
बार्शीतील रुग्णसेवा तीन जिल्ह्यांसाठी वरदान
बार्शीतील रुग्ण सेवा ही सोलापूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरली आहे. मात्र, स्थानिक बार्शीकर नाहक बदनामी का करीत आहे असा सवाल यावेळी डॉ. लोंढे यांनी उपस्थित केला.
---
फोटो
250821\16101737-img-20210825-wa0018.jpg
कौतुक राहिले निदान विनाकारण डॉक्टर व वैद्यक क्षेत्रात बदनाम करू नका- डॉ रामकृष्ण लोंढे