कारखान्याच्या कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवन येथे झालेल्या या सभेत अहवाल वाचन व स्वागत कार्यकारी संचालक समीर सलगर यांनी केले. प्रारंभी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन, कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी आप्पासाहेब काडादी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कारखान्याचे अध्यक्ष काडादी यांनी प्रास्ताविकेत कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. याप्रसंगी सभेत ऑनलाइन सहभागी झालेले हरिभाऊ कुलकर्णी, प्रा. व्ही. के. पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नांना काडादी यांनी समर्पक उत्तरे दिली.
अहवाल सालात मृत्युमुखी पडलेले सभासद महादेव पाटील (शेगाव, ता. अक्कलकोट), गुरुसिद्धप्पा कोरे (खडकी, ता. तुळजापूर) यांच्या वारसांना प्रत्येकी तीन लाखांच्या विम्याच्या रकमेचा धनादेश काडादी यांच्या हस्ते देण्यात आला.
तसेच २०१९-२० या हंगामात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल सचिन शिवशेट्टी, शांताराम शिंदे, नागनाथ हिरापुरे, देवेंद्र शुगुर, राजशेखर वाले या गुणवंत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा धनादेश व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या सभेस गुरुराज माळगे, पुष्पराज काडादी, अॅड. शिवशंकर बिराजदार, रमेश बावी, प्रकाश वानकर, बाळासाहेब बिराजदार, सिद्रामप्पा कराळे, सुधीर थोबडे, सुरेश झळकी, अमर पाटील, गुरुसिद्ध म्हेत्रे, शिवानंद निंबाळ, मलप्पा चांभार, शिवयोगी लालसंगी, माजी संचालक मल्लिकार्जुन पाटील, रावसाहेब सोनगे, आप्पासाहेब पाटील, शरणराज काडादी यांच्यासह सभासद, अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सिद्धेश्वर शीलवंत यांनी केले तर आभार ज्येष्ठ संचालक सिद्धाराम चाकोते यांनी केले.
फोटो.
०१सिद्धेश्वर कारखाना
ओळी
सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत बोलताना चेअरमन धर्मराज काडादी. व्यासपीठावर संचालक मंडळ व अधिकारी.