भीमानगर : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोविड सेंटर, टेस्टिंग किट, ऑक्सिजनअभावी रुग्णांचे हाल होत आहेत. या काळात प्रत्येक ग्रामपंचायतीला १५ व्या वित्त आयोगातून २५ टक्के निधी कोविड नियंत्रणावर खर्च करण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय पाटील भीमा नगरकर यांनी केली आहे.
यामुळे राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्वतंत्र यंत्रणा उभी करेल. याचा प्रशासनाच्या यंत्रणेवरील ताण कमी होईल.
आज लसीकरण असेल, टेस्टिंग असेल, रुग्णांची देखभाल असेल, आरोग्य खाते, पोलीस खाते प्रत्येकाचा ही यंत्रणा सांभाळताना जीव मेटाकुटीला आला आहे. अशा परिस्थितीत ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगातून २५ टक्के निधी खर्चाला मान्यता द्यावी. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायत स्थानिक पातळीवर सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी आशा वर्कर, ग्रामपंचायत सदस्य, गावातील लोकांची ग्रामपंचायतीमार्फत टेस्टिंग करेल. रुग्णांसाठी ५० खाटांचे कोविड सेंटर उभे करेल. याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून तत्त्वतः मान्यता द्यावी, अशी माहिती संजय पाटील भीमानगरकर यांनी केली आहे.
-----