सध्या मतदारसंघात सर्वत्र शेतकऱ्यांची विजेची मागणी सातत्याने वाढत असून, शेतकऱ्यांची पिके व फळबागा यांना वेळेवर पाणी देणे आवश्यक असते. नदी, कालवा, विहिरी, कूपनलिका, शेततळ्यांत पाणी असूनही वेळेवर व पुरेशा दाबाने वीजपुरवठा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांची पिके व फळबागा जळून नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी महावितरण कंपनीच्या बार्शी विभागाच्या माढा तालुक्यातील कुर्डू, पिंपळनेर, पडसाळी, अरण, एमआयडीसी टेंभुर्णी, वरवडे आणि पंढरपूर तालुक्यातील बाभूळगाव व मेंढापूर येथील सध्या अस्तित्वात असलेल्या ३३/११ सबस्टेशनमध्ये नवीन वाढीव ५ एमव्हीएच्या ट्रान्सफार्मरला मंजुरी मिळावी. माढा तालुक्यातील लऊळ व निमगाव (टें) ,पंढरपूर तालुक्यातील अजनसोंड व रोपळे व माळशिरस तालुक्यातील जांभूड व महाळुंग या सहा ठिकाणी नवीन ३३/११ सब स्टेशनला तातडीने मंजुरी मिळावी, अशी मागणी आ. शिंदे यांनी केली आहे.
----