महिम ग्रामपंचायतीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत १५ पैकी ११ जागा शेकापला मिळाल्या तर शिवसेना-राष्ट्रवादीला अवघ्या चार जागेवर समाधान मानावे लागले होते. २६ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. के. तोटावाड यांच्या अधिपत्याखाली सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी शेकापकडून सरपंचपदासाठी वसंत ईश्वरा रुपनर, अर्चना सुरेश नारनवर व आबासो कारंडे असे तीन अर्ज तर उपसरपंच पदासाठी शेकापकडून शंकर लक्ष्मण चौगुले व शिवसेनेकडून आशाबाई बिभीषण पाटील असे दोन अर्ज प्राप्त झाले होते. ऐनवेळी वसंत रुपनर यांनी अर्ज माघारी घेतला. त्यानंतर शेकापचे सदस्य शंकर चौगुले यांनी गुप्त मतदान घेण्याची मागणी केली. यावेळी गुप्त मतदानप्रक्रियेत शेकापच्या उमेदवार अर्चना सुरेश नारनवर यांना ८ तर शेकापचेच दुसरे उमेदवार आबासो कारंडे यांना ७ मते मिळाली. उपसरपंचपदासाठी शिवसेनेच्या उमेदवार आशाबाई पाटील यांना ८ तर शेकापचे शंकर चौगुले यांना ७ मते मिळाली. ऐनवेळी शेकापचे एक मत फुटल्याने उपसरपंचपदाचे उमेदवार शंकर चौगुले यांचा पराभव झाला. निवडणूक प्रक्रियेसाठी ग्रामसेवक बाबासाहेब खटकाळे यांनी सहकार्य केले. यावेळी शेकाप, शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
फोटो ::::::::::::
सरपंच अर्चना नारनवर
उपसरपंच आशाबाई पाटील