सोलापूर : सोमवारी सोलापूर - बार्शी महामार्गावरील अकोलेकाटी - मार्डी या मार्गावर पूर्व भागातील एका तरूणींचा संशयास्पद मृत्यू झाला. घटना घडून २४ तास उलटत आले तरी यातील आरोपींचा तपास लागत नाही. मागील कित्येक वर्षापासून शहरातील तरूणींवर होणारे अत्याचाराचे प्रमाणही वाढलेले आहेत. सोलापूरातील तरूणी सुरक्षित आहेत का असा सवाल करीत तिचा मृत्यू कशामुळे झाला याचा लवकर शोध लावून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी आ. प्रणिती शिंदे यांनी सोलापूर जिल्हा नियोजन मंडळाच्या सभेत केली़. यावेळी बोलताना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितले की, सोमवारी झालेली घटना अत्यंत दु:खद आहे़ या प्रकरणाचा जलदगतीने तपास करण्याचे आदेश पोलीसांना दिले आहेत़ त्या मुलीचे पोस्टमार्टम सुरू आहे पोस्टमार्टम अहवाल आल्यावर नेमका मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होईल अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली़
सोलापूरातील तरूणी सुरक्षित आहेत का ? आ. प्रणिती शिंदेंचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:34 PM
सोलापूर जिल्हा नियोजन मंडळाच्या सभेत आ़ प्रणिती शिंदे आक्रमक
ठळक मुद्दे- जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन मंडळाची बैठक सुरू- जिल्ह्याच्या विकासाबाबत चर्चा सुरू- बैठकीस लोकप्रतिनिधींसह सर्वच विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित