सोलापूर: रागाला क्षुल्लूक कारणही पुरेसं आहे. लागलीच टोकाचं पाऊल उचललं जात आहे. सोलापुरात रविवारी मुरारजी पेठेत एका तरुणीनं आई आणि बहिणीशी वाद झाला म्हणून कटरनं स्वत:च्या डाव्या हाताला कापून घेण्याचा प्रयत्न केला. बिलकिस अमजद कुरेशी (वय- ३२) असे तरुणीचं नाव आहे. शहरातल्या जुनी पोलीस लाईन मुरारजी पेठ परिसरात जखमी बिलकिस या राहतात.
रविवारी सायंकाळी ६:१५ च्या सुमारास त्यांच्यामध्ये आणि आई व बहिणीशी कुरबूर झाली. रागाच्या भरामध्ये बिलकिस यांनी घरातील कटरने डाव्या हातावर मारुन घेतले. यामुळे रक्ताळलेल्या हातावर उपचार करण्यासाठी स्वत: शासकीय रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेतले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.