येत्या काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असून या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचे अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातील सर्व बाल रुग्णालयातील २० टक्के बेड कोरोनाग्रस्त बाल रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. माळशिरस तालुक्यातील ७ बाल रुग्णालयात १८७ बेडची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
---
अशी असेल बेडची व्यवस्था
५३ बेड अगोदरच आरक्षित, ३० ऑक्सिजन व १ व्हेंटिलेटर बेडचा समावेश आहे. तर उर्वरित ३५ बेडचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून ९९ बेडचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. उपजिल्हा रुग्णालय अकलूज २० बेड, ग्रामीण रुग्णालय माळशिरस १० बेड, श्रीराम बाल रुग्णालय अकलूज ११ बेड, आर्या बाल रुग्णालय नातेपुते २० बेड याप्रमाणे एकूण ५३ मंजूर करण्यात आले आहेत.
----
मंजुरीच्या प्रतीक्षेत बेड
लहान मुलांचे हॉस्पिटल अकलूज २० बेड व चाईल्ड केअर हॉस्पिटल मध्ये १५ अशा ३५ बेडचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शिवाय ओंकार हॉस्पिटल अकलूज १०, जामदार हॉस्पिटल अकलूज १०, अपेक्स हॉस्पिटल अकलूज १७, धोत्रे हॉस्पिटल अकलूज १२, राऊत हॉस्पिटल पिलीव १०, माने देशमुख हॉस्पिटल पिलीव १०, वाघमोडे हॉस्पिटल माळशिरस १०, पवार हॉस्पिटल माळशिरस १०, भरती वाघमोडे हॉस्पिटल माळशिरस १० असे ९९ बेड मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.
---