बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागात शेतीपंपाचे २८ हजार २४६ ग्राहक आहेत. त्यांच्याकडे ३४८ कोटी ४० लाख एवढी थकबाकी आहे. त्यात ९३ कोटी रुपये महावितरण सूट देणार आहे, तर ३५ कोटी रुपये विलंब आकार आणि दंड आहे. तो देखील कमी केला जाणार आहे. अशी सप्टेंबर २०२० अखेर थकबाकी २१९ कोटी व चालू बाकी २९ कोटी रुपये आहे. या थकीत ग्राहकांसाठी कृषी संजीवनी योजना सुरू आहे. यात सप्टेंबर आणि डिसेंबरची चालू बिले भरावयाची आहेत. जुन्या बिलामध्ये सूट व विलंब आकार अशी ६० टक्के सूट मिळणार आहे.
गत वर्षात वरील थकबाकी मधील ९ कोटी ६० लाख रुपये शेतकऱ्यांनी भरले आहेत. ग्राहकांनी सध्या सुरू असलेल्या सवलतीचा फायदा घेण्यासाठी वीज बिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन बार्शी विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक लहामगे यांनी केले.
----
थकबाकी नसलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय का?
सर्व प्रकारची वसुली करण्यासाठी कनेक्शन्स तोडण्याची कारवाई केली जात आहे. यामध्ये ग्रामीण भागात एका शेतकऱ्याचे कनेक्शन कट न करता ट्रान्स्फॉर्मरवरील वीजच बंद केली जात आहे. त्यामुळे ज्यांची बाकी नाही, अशा शेतकऱ्यांनाही याचा फटका बसत आहे. त्यासाठी महावितरणने सरसकट ट्रान्स्फॉर्मर बंद न करता, ज्याचे बिल थकीत आहे, त्याला वीज बिल भरण्यासाठी प्रवृत्त करावे व बाकी शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
---