याबाबत माहिती अशी की, २७ मार्च रोजी मोहोळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सिद्ध नागेश पाणीपुरवठा योजनेचे वीज कनेक्शन थकबाकीपोटी वीज महावितरण कंपनीने खंडित केले. दरम्यान, नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी दहा लाख रुपयांचा धनादेश घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना विनवण्या केल्या. मात्र, तुम्ही पूर्ण बिल आरटीजीएस केल्याशिवाय आम्ही वीज पूर्ववत जोडणार नसल्याचा पवित्रा महावितरण अधिकाऱ्यांनी घेतला. लोकप्रतिनिधींनीही वीज जोडण्याची विनंती केली. मात्र, थकबाकीनंतरच वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
नगरपरिषदेच्या कारवाईप्रसंगी वसुली पथक प्रमुख सुवर्णा हाके, आरोग्य अभियंता अमित लोमटे, संगणक अभियंता महेश माने, विद्युत अभियंता राजकुमार सपाटे, लेखापाल रोहित कांबळे, माजी नगरसेवक रूपेश धोत्रे, राष्ट्रवादीचे संतोष सुरवसे, रोहित फडतरे, बापूसाहेब आठवले यांच्यासह कर्मचारी दिलीप जाधव, दिनेश गायकवाड, कोंडिबा देशमुख, संगीता बोराडे, सादिक सुर्की, आदी उपस्थित होते.
---
महावितरणकडून वेठीस धरण्याचा प्रयत्न
मात्र, महावितरण कंपनीने ऐकून न घेता, ऐन उन्हाळ्यात शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना, तसेच दोन दिवस बँका बंद असताना, नगरपरिषदेला वेठीस धरण्याचा प्रकार केला. दरम्यान, विद्युत अभियंता राजकुमार सपाटे यांनी नगरपरिषदेची थकबाकी असलेले १६ लाख ८० हजार चारशे रुपये महावितरण कंपनीला आरटीजीएस केले आणि वीजपुरवठा सुरळीत झाला.
---
नगरपरिषदेकडूनही जशास तसेच उत्तर
दरम्यान, कुरुल रोड परिसरात असलेल्या १३२ के.व्ही. महावितरण कंपनीकडे नगरपरिषदेची १० लाख ५४ हजार ९९० रुपयांची थकबाकी आहे. यासाठी नगरपरिषदेचे शिष्टमंडळ येथील कार्यालयात पोहोचले आणि थकबाकीपोटी त्यांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयाला सील ठोकले आणि जशास तसे उत्तर दिले.
३०मोहोळ
वीज वितरण कंपनीला सील ठोकताना राष्ट्रवादीचे संतोष सुरवसे, रोहित फडतरे, माजी नगरसेवक रूपेश धोत्रे, पथक प्रमुख सुवर्णा हाके, अमित लोमटे, महेश माने, राजकुमार सपाटे, रोहित कांबळे, आदी.