याचाच फायदा घेऊन काही विक्रेत्यांकडून खताची चढ्या भावाने विक्री होण्याची शक्यता आहे. यामध्ये कृषी विभागाने लक्ष घालून पंढरपूर तालुक्यातील अधिकृत विक्रेत्यांकडे युरियासह अन्य रासायनिक खते उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून होत आहे.
साठेबाजीची शक्यता
पावसाळा आला की आवश्यक नसताना मोठमोठे शेतकरी लाखो टन खतांची खरेदी करून साठेबाजी करतात. त्यामुळे लहान लहान शेतकऱ्यांना गरज असतानाही खते मिळत नाहीत. असे प्रकार अनेकदा घडले आहेत. तर शेतकऱ्यांच्या नावाखाली मोठे व्यापारीही टंचाई निर्माण करून चढ्या दराने विक्री करण्यासाठी कृत्रिम टंचाई निर्माण करत असतात. कृषी विभाग खताची टंचाई नाही, असे सांगत असतानाही खते मिळत नसतील तर उपलब्ध खत साठा जातो कुठे, असे सवाल लहान शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
कोट ::::::::::::::::
सध्या पंढरपूर तालुक्यात कोणत्याही खताची टंचाई नाही. आवश्यक मागणीप्रमाणे खतसाठा उपलब्ध होत आहे. ग्रामीण भागातील काही शेतकरीच आवश्यकता नसतानाही मोठ्या प्रमाणात खत खरेदी करून ठेवू शकतात. म्हणून कृत्रिम टंचाई जाणवू शकते. मात्र खतांची टंचाई नाही. कुणाला खते मिळत नसतील तर आपल्याशी संपर्क साधावा. खरिपाच्या हंगामात आवश्यक खत टंचाई जाणवू नये यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
- आर. जी. पवार
तालुका कृषी अधिकारी, पंढरपूर