शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
3
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
4
दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
5
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
6
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीची मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
7
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
8
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
9
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
10
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
11
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
12
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा
13
मराठी अभिनेत्रींना हिंदी सिनेमांत कामवाली बाईच का दाखवतात? तृप्ती खामकर म्हणाली- "कारण..."
14
Maharashtra Election 2024: हीना गावितांमुळे शिंदेंची शिवसेना अडचणीत; 'हे' आहे बंडखोरीचं कारण
15
Crime Video: मुख्याध्यापकाची गोळ्या घालून हत्या; हादरवून टाकणारी घटना कॅमेऱ्यात कैद
16
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
17
'भूल भूलैय्या ३'ने 'सिंघम अगेन'ला केलं धोबीपछाड! Box Office कलेक्शनमध्ये कार्तिक आर्यनचा सिनेमा ठरला सरस
18
इस्रायलचा सीरियाच्या राजधानीजवळ 'एअरस्टाईक'; दमास्कसमध्ये हिज्बुल्लाच्या तळांना केलं लक्ष्य
19
Noel Tata Joins Tata Sons : टाटा कुटुंबात १३ वर्षांत पहिल्यांदा झालं 'हे' काम, रतन टाटांच्या निधनानंतर काय बदललं?
20
Gold Price 5 Nov 2024: तेजीची हवा निघाली...! दिवाळी संपताच जोरदार आपटले सोने-चांदी! पटापट चेक करा कशी असेल आजची स्थिती?

चित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली "बिलोरी"झेप?

By राजा माने | Published: September 19, 2018 5:49 PM

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर हे त्याचे गाव.सोलापूर-पुणे हायवे वरील "लंबोटी चिवडा"साठी प्रसिद्ध असलेल्या लंबोटी या गावालगतच त्याच्या शिरापूर गावाला जाणारा

- राजा माने

पेन्सिलचित्रांचा जनक.. ज्याच्या चित्रातील पात्रांचे भाव टिपता टिपता आपणच चित्रांच्या भावरंगात हरवून जातो..ज्याच्या चित्रांच्या देशातील ट्रॅव्हल शो ला आपण तर डोक्यावर घेतलेच पण त्याच्या अनेक चित्रांनी जगभरातील प्रदर्शनात कलाप्रेमींना तोंडात बोटे घालायला भाग पाडले..तोच शशिकांत धोत्रे ! उपाशीपोटी असतानाही जिद्दीने मोठीच स्वप्ने पाहण्याची सवय जडलेला हा अवलिया पेन्सिलने चित्र तर रेखाटतो पण चित्रातील पात्रांचे भावविश्व उभे करताना ते चित्र पाहणाऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न जन्मी घालेल अशा रेषांचे बीजारोपणही करतो. चित्रजगतात असंख्य रंगांची पाखरण करणारा अवलिया शशिकांत आपल्या स्वतःच्या जीवनातही रंगभरण अव्याहतपणे चालूच ठेवतो ही त्याची खासियतच! बरं, त्या रंगांना कोणत्याही फ्रेमची चौकट नसते की मर्यादा नसते.त्याच कारणाने नव्या नव्या कार घेऊन तो शेकडो कि. मी.स्वतःच ड्राईव्ह करीत भटकताना दिसतो.त्याची "कार पॅशन"त्याला जशी "फेरारी" घ्यायला भाग पाडते तशीच "सिनेमा पॅशन" त्याला नागराज मंजुळे,भाऊराव कऱ्हाडेपासून अनेक स्ट्रगलर सोबत गप्पांच्या मैफिलीत हरवून टाकते.गावाकडच्या मित्रांत हरवून जाणारा हा जागतिक कीर्तीचा चित्रकार सध्या "बिलोरी"झेप घेण्यात मग्न आहे.काय आणि कसली आहे,ही झेप?

 

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर हे त्याचे गाव.सोलापूर-पुणे हायवे वरील "लंबोटी चिवडा"साठी प्रसिद्ध असलेल्या लंबोटी या गावालगतच त्याच्या शिरापूर गावाला जाणारा रस्ता फुटतो. त्याला गाठण्यासाठी मी तो रस्ता मी धरला. आदल्या रात्री पाऊस झालेला होता. रस्त्यावर खड्डेही बरेच होते.तो गावात नसून जवळच असलेल्या त्याचा उद्योजक मित्र सुहास आदमाने याच्या "स्पेन्का मिनरल वॉटर " प्रकल्पाच्या ठिकाणीच त्याचा ठिय्या असल्याचे समजले.मी माझा मोर्चा तिकडे वळविला.अडवळणी कच्चा रस्त्याने तिथे पोहोचलो...तर तिथे काय चित्र? थ्रीफोर्थ चड्डी अन टी शर्टवर असलेला शशिकांत हातात पाण्याची बाटली घेवून प्रकल्पाच्या शेजारी जवळच सुरु असलेल्या बांधकामाच्या परिसरात हिंडताना दिसला.मला पाहताच आनंदाने धावला आणि मला कडकडून मिठी मारली.चक्क एक महिन्यापासून तो गावकडेच होता.मित्र, निवांतपणा, एकांत आणि कुठच्याही कलावंताला हवं हवंसं वाटणारं निसर्गरम्य वातावरण! याचसाठी तो तिथे नव्या मुंबईतील स्टुडिओ ऐवजी गावाकडे आला असावा असे मला वाटले.पण त्या करणाशिवाय त्याच्या तिथल्या वास्तव्याचे आणखी एक कारण होते आणि ते म्हणजे त्याची नवी झेप!.. तो चार-पाच एकर क्षेत्रात साडे चार हजार स्क्वेअर फूट बांधकाम असलेला स्टुडिओ  उभा करतोय.. बिलोरी आकाराची इमारत,शेजारी छोटासा तलाव,स्टुडिओतच कमळांच्या फुलांचा बिलोरी आकाराचा पाण्याचा हौद आणि समोर बिलोरी आकार असलेली सुंदर बाग.. म्हणूनच तर ती बिलोरी झेप! भेट झाली आणि तो बोलू लागला.२५फूट उंचीच सुंदर दगडी बांधकाम, स्टुडिओतील व्यवस्था, विजेशिवाय सदैव लख्ख प्रकाश देणारी रचना,त्याने स्वतः  शोध घेवून विदर्भातून आणलेले दोनशे वर्षांपूर्वीचे चार खास अँटिक दरवाजे.. कला आणि कलाप्रेमींसाठी ग्रामीण महाराष्ट्रातील एक महत्वाचे आकर्षण ठरावे,असा त्याचा मानस आहे.

विख्यात आर्किटेक्ट अमोल चाफळकर यांनी हा स्टुडिओ डिझाईन केला आहे. अँटिक आणि मॉडर्न यांचा अप्रतिम मेळ या डिझाईनमध्ये घालण्यात आला आहे.अवघ्या चार महिन्यात पूर्णत्वाकडे जात असलेल्या या " बिलोरी" झेपेसाठी एका महिन्यापासून शिरापूर येथे तळ ठोकणारा शशिकांत गावाकडच्या या वास्तव्यात वाचनातही दंग राहतो. नोबेल पुरस्कार मिळालेल्या ओरहान पामुख या मूळच्या चित्रकार असलेल्या लेखकाचे " माय नेम इज रेड" हे पुस्तक वाचल्याचे आवर्जून सांगतो.

(लेखक "लोकमत"चे राजकीय संपादक आहेत)

 

टॅग्स :paintingचित्रकलाSolapurसोलापूर