चपळगाव : ''देवमाणूस'' या मालिकेतील आघाडीचे कलाकार अस्मिता देशमुख आणि सागर आव्हाड यांनी अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला भेट दिली. न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन कलाकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अस्मिता देशमुख यांनी भक्तांच्या देणगीच्या माध्यमातून चालणारे महाप्रसादालय असल्याचे गौरवोद्गार काढले.
यावेळी आ. जयंत आसगावकर, पार्थ पवार यांचे स्वीय सहाय्यक सागर जगताप, विठ्ठल तथा नाना काटे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक महेंद्र बोरसे, मुख्यमंत्री सहायता निधीचे अर्चना गावंड यांचादेखिल न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, लक्ष्मण पाटील, आप्पा हंचाटे, गोविंदराव शिंदे, सिद्धराम कल्याणी, विनायक तोडकर, एस. के. स्वामी, दत्ता माने, राजेंद्र पवार उपस्थित होते. (वा. प्र.) ---
सप्ताहाभरात विविध मान्यवरांनी दिल्या भेटी
मागील आठवड्यात स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळास अक्कलकोट बँक ऑफ इंडिया शाखेचे मॅनेजर शरणप्पा पुजारी, महाराष्ट्र सुवर्णपदक विजेते महेंद्र चव्हाण, राजस्थान कोटाचे प्रा. सचिन मुकादम, पुणे विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नागराळे या मान्यवरांनी भेटी दिल्या.
---
फोटो : ०९ चपळगाव
स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या भेटीप्रसंगी अस्मिता देशमुख यांचा सत्कार करताना अमोलराजे भोसले.