आ. जयंत आगावंकर म्हणाले, आमदारकीचा काळ हा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शासन दरबारी प्रलंबित असणाऱ्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी खर्ची घालणार आहे. झाडबुके परिवाराने केलेला हा सत्कार मी कायम स्मरणात ठेवीन. मला निवडून आणण्यामध्ये बार्शीतील सर्वांचे मोलाचे योगदान आहे”.
वर्षाताई ठोंबरे म्हणल्या, आमदार जयंत आसगावकर हे शिक्षक, संस्थाचालक व आमदार असल्याने त्यांना शिक्षणक्षेत्रातील सर्व प्रश्नांची जाणीव आहे. त्यामुळे विविधि प्रश्नांची सोडवणूक ते करतील. प्रास्ताविक सचिन झाडबुके यांनी केले. यावेळी बाबासाहेब पाटील, मुख्याध्यापक हनुमंतराव जाधवर, सुभाष पाटील, मुख्याध्यापक विक्रम टकले, प्रकाश पालके उपस्थित होते. आभार प्राचार्य डॉ. एच. एस. पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन अनिल गेळे यांनी केले.
फोटो
२८बार्शी सत्कार