पंढरपूर : आषाढी एकादशीला सावळ्या विठ्ठलाची पूजा मुख्यमंत्र्यांनी करायची ही महाराष्ट्रातील परंपरा आहे़ मराठा आरक्षण आंदोलनातील त्यांच्या पंढरी भेटीला झालेल्या विरोधामुळे मुख्यमंत्र्यांना ‘श्री’ दर्शनाचा योग आला नाही़ आषाढीला हुकलेले दर्शन आता मार्गशीर्षाच्या शुध्द नवमीच्या दिवशी घेण्याची त्यांना संधी मिळाली आहे.
पंढरपुरातील विठ्ठल रूक्मिणी भक्त निवास उदघाटनाचे निमित्त होतं... सकाळी सोलापुरातून पंढरीत त्यांचे आगमन झाले़ अन ‘श्री’ दर्शनाच्या ओढीने त्यांनी प्रथम मंदिरात जाणे पसंत केले.
आषाढी यात्रेच्या एकादशीला महापुजेचा मान मुख्यमंत्र्यांना असतो. मात्र मराठा समाजाला आरक्षण द्या अन्यथा, आषाढी एकादशीनिमित्त होणाºया विठ्ठल रुक्मिणी मातेच्या महापूजेस मुख्यमंत्र्यांना येऊ देणार नाही. असा पवित्रा मराठा समाजातील काही बांधवांनी घेतला होता. यामुळे मुख्यमंत्री देवेद्र फडवणीस यांनी पंढरपूर येथे महापूजा येण्यास टाळून घरामध्येच विठ्ठलाची पूजा केली होती.
त्यानंतर अधिवेशनामध्ये मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या १६ टक्के आरक्षण जाहीर करण्यात आले. परंतु सोमवारच्या दौºयादरम्यान देखील अनेक संघटनांनी आंदोलनाचे इशारे दिले होते. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे श्री विठ्ठलाचे दर्शन सुखकर झाले.