सचिन कांबळे पंढरपूर : आषाढी यात्रेत वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन भाविकांना त्रास होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष तयारी केली असून या कामासाठी ९७३ जणांचा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
आषाढी यात्रेसाठी रेल्वे, एस. टी. बस व खासगी वाहनाने लाखो भाविक पंढरपुरात दाखल होतात. शिवाय हजारो वाहने शहरात येतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून वाहतुकीचा आराखडा तयार केला आहे. वाहतुकीचे नियोजन योग्य प्रकारे व्हावे, यासाठी वाहतूक शाखा कामाला लागलेली असते.
१४ ते २८ जुलैदरम्यान पंढरपूर परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये म्हणून शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावर एकेरी वाहतूक करणे, गर्दीच्या ठिकाणी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. पार्किंगची ठिकाणे निश्चित केली आहेत. त्याचबरोबर एस. टी. साठीही नवीन बसस्थानके तयार केली आहेत.
वाहतुकीवर नियंत्रण असावे यासाठी १ अपर पोलीस अधीक्षक, २ उपविभागीय पोलीस अधिकारी, १० पोलीस निरीक्षक, ४० सहायक पोलीस निरीक्षक, ४०० गामा कमांडो, ३२० वाहतूक पोलीस कर्मचारी, १०० पोलीस कर्मचारी, १०० होमगार्ड यांचा बंदोबस्त लावला असल्याची माहिती सपोनि सारंग चव्हाण यांनी दिली़ याकामी त्यांना पोना दौलतराव तलावार, पोना जनार्धन गरंडे, प्रवीणकुमार सोनवले, मेहबूब इनामदार, पोकॉ जावेद तांबोळी यांचे सहकार्य मिळत आहे.
शहरातून बाहेर जाणाचा मार्ग- टेंभुर्णी, नगर, सोलापूर, लातूरकडे जाणाºया सर्व गाड्या सावरकर चौक, नवीन कराड नाका, कॉलेज क्रॉस रोड, कौठाळी बायपास, नवीन सोलापूर नाका, करकंबमार्गे जातील. पुणे, साताराकडे जाणाºया सर्व गाड्या सावरकर चौक ते नवीन कराड नाका, कॉलेज क्रॉस रोड वाखरीमार्गे इच्छित स्थळी जातील. विजयपूर, कराड, आटपाडी, कोल्हापूर, सांगली, मिरज, मंगळवेढामार्गे जाणाºया सर्व गाड्या सावरकर चौक ते गादेगाव फाट्यापासून संबंधित मार्गाने इच्छित स्थळी जातील.
या ठिकाणी प्रवेश बंद- यात्रा कालावधीत संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल़ महाद्वार चौक ते शिवाजी चौक हा मार्ग सर्वप्रकारच्या वाहनांसाठी व वाहतुकीसाठी प्रवेश बंद आहे. सावरकर चौक ते शिवाजी चौक या मार्गावर सर्वप्रकारच्या वाहनांना बंद असेल़ नियमित ट्रक व यात्रेसाठी सोडण्यात येणाºया एस. टी. बस यांना जुना दगडी पूल ते तीन रस्ता मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. मंगळवेढा नाका, महात्मा फुले चौक या मार्गाने शहरात सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद आहे. अंबाबाई पटांगण ते भजनदास चौक, अंबाबाई पटांगण ते अर्बन बॅँक, सावरकर चौक ते भक्तिमार्ग ते काळामारुती चौक या मार्गावर सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद आहे. लहूजी वस्ताद चौक ते काळा मारुती चौक या मार्गावर सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद आहे.
बाहेरून येणाºया वाहनांचे पार्किंग- नगर, बार्शी, सोलापूर, मोहोळकडून येणारी वाहने करकंब क्रॉस रोड, अहिल्यादेवी चौक शेटफळ चौकमार्गे विसावा येथे पार्क करतील. तसेच ६५ एकर येथे फक्त दिंडी व पालखीची वाहने पार्क केली जातील़ पुणे, सातारा, वाखरीमार्गे येणारी वाहने इसबावी विसावा, गाताडे प्लॉट व कॉलेज क्रॉस रोड, कॉलेज चौकीच्या पाठीमागील मैदानात पार्क करतील. कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने वेअर हाऊस येथे पार्क करतील.
कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोलामार्गे येणारी वाहने ही कासेगाव फाटा, टाकळी बायपासमार्गे वेअर हाऊस येथे पार्क करतील किंवा टाकळीमार्गे येऊन टाकळी हायस्कूल मैदान येथे पार्क करतील. विजापूर, मंगळवेढ्याकडून येणारी वाहने ही कासेगाव, कासेगाव फाटा, टाकळीमार्गे येऊन वेअर हाऊस येथे पार्क करतील. तसेच यमाई-तुकाई मंदिर मैदान येथे पार्क करतील. बार्शी, सोलापूर या मार्गावरुन तीन रस्ता येणारी वाहने अहिल्यादेवी चौक नवीन पुलामार्गे तीन रस्ता येथील नगरपालिका वाहनतळावर उतरतील.
एस. टी. चे पार्किंग व नवीन बसस्थानके- विदर्भ, मराठवाडा, सोलापूर विभागातील यात्रेसाठी येणाºया एसटी बससाठी भीमा बसस्थानक तयार आहे. नगर विभाग, नाशिक विभाग व जळगाव विभागाकडून येणाºया बस या विठ्ठल अलायटिंग पॉर्इंट (अहिल्या चौकजवळ) येथे भाविकांना सोडतील व विठ्ठल सहकारी साखर कारखाना गुरसाळे येथे पार्क होतील़ मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली व कोकण विभागाकडून येणाºया एस. टी. बस या कासेगाव फाटा, टाकळी बायपास, गादेगाव फाटा, गादेगाव, सातारा नाला, बाजीराव विहीर, कौठाळी बायपास फाटा, जुन्या अकलूज रोडने चंद्रभागा बसस्थानक या ठिकाणी येतील तसेच वरील मार्गे भाविकांना घेऊन परत जातील. या बस चंद्रभागा बसस्थानक याठिकाणी पार्क होतील.