शहाजी काळे पंढरपूर : आषाढी वारीनिमित्त पंढरी नगरीत येणारा वारकरी पंढरीची वारी स्मरणात रहावी, या धारणेने परतीच्या प्रवासाला लागताना विविध दैवतांच्या फोटोंपैकी किमान एकातरी फोटोची खरेदी करतोच़ यातून पंढरी नगरीत आषाढी यात्रा काळात दोन कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल होणे अपेक्षित असल्याचे फोटो व्यावसायिकांनी सांगितले.
आषाढी वारीनिमित्त पायी चालत येणाºया वारकºयांची संख्या लाखोंच्या संख्येत असते. वारकरी दर्शनानंतर परतीच्या प्रवासात विविध देवतांची प्रतिमा खरेदी करून मनोभावे घरी घेऊन जातात. सध्या पंढरपूरमध्ये २० ते २५ स्थानिक फोटो व्यावसायिक कार्यरत आहेत़ यामधील १४ ते १५ व्यावसायिक फोटो फ्रेम स्वत: तयार करून विक्री करतात. तसेच आषाढी वारीनिमित्त बाहेरून ६० ते ७० व्यावसायिक वारीत फोटो विक्रीची दुकाने थाटतात.
वारी काळात श्री विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ आदींसह विविध देवतांच्या प्रतिमेला वारकºयांची सर्वाधिक पसंती असते. येथील फोटो व्यावसायिकांकडे १० रुपयांपासून ते १५ हजार रुपयांपर्यंतचे फोटो विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आषाढी यात्रा काळात ५० रुपये ते १०० रुपयांपर्यंतच्या फोटो प्रतिमेला मोठी मागणी असते. यातून प्रत्येक व्यावसायिकाची दोन ते अडीच लाखांपर्यंत फोटो विक्रीतून उलाढाल होते़ पंढरीतील १०० व्यावसायिकांतून दोन कोटींची उलाढाल होईल, असा अंदाज व्यापाºयांमधून वर्तवला जात आहे. पाऊस झाल्यास त्याचा फटका व्यवसाय घटण्यावर परिणाम होत असल्याचे पंढरपुरातील व्यापाºयांनी सांगितले.