शहाजी काळे पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सुमारे ७० कोटी रुपये खर्चून पंढरपुरात येणाºया भाविकांच्या सोयीसाठी सुसज्ज असे भक्तनिवास उभाण्यात आले आहे.आषाढी वारीदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता होती, पण काही काम अपूर्ण असल्याने आषाढीनंतर या भक्तनिवासाचे उद्घाटन होईल, असे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ़ अतुल भोसले यांनी सांगितले़
पंढरपुरात येणाºया भाविकांना निवासाची सोय व्हावी, म्हणून मंदिर समितीच्या वतीने २६ डिसेंबर २०१४ साली या इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ केला़ हे भक्तनिवास सुमारे साडेआठ एकर जागेवर बांधण्यात आले आहे़ या भक्तनिवासात एकूण २७३ खोल्या बांधण्यात आल्या असून त्यात ४ व्हीआयपी सूट, ६ फॅमिलीसाठी खोल्या, दोन बेडच्या १३२ खोल्या, ५ बेडच्या ६३ खोल्या, ८ बेडच्या ७८ खोल्या आणि वन बीएचके १० प्लॅट बांधण्यात आलेले आहेत़ या भक्तनिवासात एकाचवेळी १ हजार २०३ वारकरी राहू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे़
तसेच या भक्तनिवासात तळमजल्यावर १ लाख चौ़ फुटाची पार्किंग व्यवस्था, भक्तनिवासाच्या मध्यभागी धार्मिक, सांस्कृतिक समारंभासाठी ४० हजार स्क्वेअरवर लॉन्स, भव्य स्टेज, रंगीबेरंगी आकर्षक विद्युत रोषणाई, मेघडंबरी रचना केली आहे़ आधुनिक वास्तुकलेचा एक नमुना म्हणून ओळखली जाईल, अशी ही भक्तनिवासाची वास्तू आहे़
भक्तनिवासाच्या बाहेरील बाजूस एकूण ३८ गाळे बांधण्यात आलेले आहेत़ तसेच अग्निशमन यंत्रणा, घनकचरा व्यवस्थापन, सेंद्रिय खतनिर्मिती, मैला शुद्धीकरण, रेनवॉटर हार्वेस्टिंग, विजेसाठी सोलर यंत्रणा, सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत़ सुरुवातीला या भक्तनिवासासाठी ५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते, मात्र इमारत बांधकाम पूर्ण होईपर्यंतच ५६ कोटी रुपये खर्च झाले़ त्यानंतर फर्निचर ५ कोटी ३४ लाख, फायर ब्रिगेडसाठी १ कोटी, इलेक्ट्रिकसाठी ४ कोटी १४ लाख रुपये असा खर्च वाढत-वाढत तो आता ७० कोटींच्या घरात गेला आहे़ त्यामुळे मंदिर समितीच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडल्यामुळे समितीच्या पंढरपुरातील वेगवेगळ्या बँकेत असणाºया बºयाच ठेवी भक्तनिवासाच्या बांधकामासाठी मोडाव्या लागल्या आहेत़ त्यानंतरच हे भक्तनिवास भाविकांच्या निवासासाठी सज्ज झाले आहे़
उत्तम व्यवस्थापनाची गरज
- - तब्बल ७० कोटी रुपये खर्च करून पंढरीत येणाºया भाविकांसाठी सुसज्ज असे भक्तनिवास बांधण्यात आले आहे, मात्र पांडुरंगाचे भक्त हे शेतकरी, कष्टकरी असल्याने त्यांच्याकडून रूमसाठी जादा भाडे घेणे अशक्य आहे़
- - शिवाय दैनंदिन व्यवस्थापनासाठी जादा कर्मचाºयांची नियुक्ती करावी लागणार आहे़ त्यामुळे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होण्याची शक्यता आहे़ त्यासाठी हे भक्तनिवास कायमस्वरूपी सुरू ठेवायचे असेल तर उत्तम व्यवस्थापनाची गरज आहे़