वैराग : मोटारसायकलमध्ये हवा भरण्याचा पंप परत मागितल्याने रागाने भावाने सख्ख्या भावाचे डोके फोडल्याची घटना बार्शी तालुक्यातील मिर्झनपूर येथे घडली आहे. याबाबत जखमी रामेश्वर लाटे यांनी फिर्याद दिली असून, बापू सज्जनराव लाटे व त्याची पत्नी वंदना बापू लाटे यांच्याविरोधात वैराग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रामेश्वर व बापू हे दोघे वडिलोपार्जित शेतामध्ये एकमेकांच्या शेजारी राहतात.
३१ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रामेश्वर याच्या दुचाकीचे चाक पंक्चर झाले. त्याने शेजारीच राहणारा भाऊ बापू यास दिलेला हवा भरण्याचा पंप परत मागितला. तेव्हा तुझा कुठला पंप असे म्हणून बापूने शिवीगाळ करत लोखंडी गज डोक्यात मारून जखमी केले, तर त्याची पत्नी वंदना हिने शिवीगाळ केली.