२४ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी सांगोला पोलिसांनी युवराज रावसाहेब नलवडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सुत्रांकडील माहितीनुसार शिरभावीत मेटकरी वस्ती येथे रावसाहेब नलवडे यांची शेती आहे. येथे आंब्याची बाग असून, यंदा आंबे खरेदीसाठी संगेवाडीतील व्यापारी शंभू पाटीलसह दोघेजण आले होते. इतक्यात मोठा मुलगा युवराज हा मद्यधुंद अवस्थेत तेथे आला आणि त्या व्यापाऱ्यांना आंबे विकत घेण्यासाठी का आलात म्हणत शिवीगाळ सुरू केली. यावेळी वडील रावसाहेब हे त्याची समजूत घालत खरेदीदारांना आंबे घ्यायला विरोध करू नको, हवे तर आंबे विक्रीचे पैसे घे, असे म्हणाले.
इतक्यात युवराज याने बाजुला पडलेली वेळूची काठी घेऊन अंगावर धावून आला. त्या काठीने पित्याच्या डोक्यात मारून तोंडावर हाताने बुक्की मारली. या हल्ल्यात खालील चार दात पडले. रक्तबंबाळ अवस्थेतील रावसाहेबांना सोडवण्यासाठी त्यांच्या पत्नी शारदाबाई आणि दुसरा मुलगा कुलदीप आले. या दोघांनाही मारहाण केली. याबाबत रावसाहेब यांनी फिर्याद दिली आहे.