मोहोळ येथील श्रीराम मंगल कार्यालयात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पंढरपूर निवडणुकीचे निवडणूक निरीक्षक व्ही. व्ही. गिरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निवडणुकीसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर घेतले. यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर आणि आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. सुधीर जोशी व महेश कोटीवाले यांनी प्रशिक्षण दिले. या निवडणुकीसाठी मोहोळ तालुक्यातील मतदान केंद्राध्यक्ष २५०, सहायक मतदान केंद्राध्यक्ष २५०, मतदान अधिकारी १ व २ कर्मचारी ५०० अशा एकूण १ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याची माहिती निवडणूक नायब तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी दिली.
यावेळी तहसीलदार जीवन बनसोडे, नायब तहसीलदार राजशेखर लिंबारे, नायब तहसीलदार लीना खरात, महेश कोटीवाले, सुधीर जोशी, मोईन डोणगावकर, महेंद्र नवले, मनोज पुराणिक, योगेश अनंतकवळस उपस्थित होते.
कोरोनाचे नियम पाळावे
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या कालावधीत ही निवडणूक होत असल्याने निवडणूक केंद्रांवर शासकीय कर्मचाऱ्यांनी कोविडबाबतचे सर्व नियम पाळून मतदान प्रक्रिया पार पाडावी. या निवडणुकीत सकारात्मक पद्धतीने आपले कर्तव्य बजावावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.
फोटो
०५मोहोळ
ओळी
पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मोहोळ येथे घेतलेल्या प्रशिक्षणादरम्यान कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, उपजिल्हा निवडूक अधिकारी भारत वाघमारे यांच्यासह अन्य.