सोलापूर : मूळचे सोलापूरचे असलेले आणि सध्या पोलीस आयुक्तालयातील मानव संसाधन विभागात कार्यरत सहाय्यक फौजदार नागनाथ फुटाणे यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल यंदाचे ‘राष्ट्रपती पोलिस पदक २०२३’ जाहीर झाले आहे. नक्षलवादी परिसर आणि नाशिकचा कुंभमेळा यासह विविध कामामध्ये केलेल्या कामगिरीचे हे फळ असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
फुटाणे यांच्या सेवेची सुरुवात एसआरपी कॅम्प गट क्र. १० सोरेगाव येथून १९९० सालापासून सुरु झाली. या काळात त्यांनी नक्षलवादी परिसर असलेल्या गडचिरोली, चंद्रपूर परिसरात बंदोबस्ताची सेवा बजावली. यानंतर २००७ ला ते नाशिक येथे बदलून गेले. सध्या ते सोलापूर पोलिस आयुक्तालयात कार्यरत आहेत. त्यांनी पोलिस मुख्यालय, विशेष शाखा, कंट्रोल रुम, सदर बझार अशा विविध ठिकाणी सेवा बजावली आहे. सन २०१८ साली त्यांना पोलिस महासंचालक यांचे पदक प्राप्त झाले आहे.आनंदाचा क्षणराष्ट्रपती पदक मिळाल्याची माहिती समाज माध्यमातून मिळाली. यादीमधील माझे नाव पाहिल्यावर मला आजवरच्या ३३ वर्षाच्या सेवेत केलेल्या कामाची चिज झाले. माझ्या कुटुंबियांना, मित्रपरिवाराला खूप आनंद झाला. आजचा दिवस आम्हा कुटुंबीयांच्या दृष्टीने आनंदाचा क्षण असल्याची भावना फुटाणे यांनी व्यक्त केली.हनपुडे - पाटील यांनाही पदकतत्कालीन विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांनाही यंदाचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. ते पोलिस सेवेत १९९१ साली पोलिस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले. त्यांनी वर्धा, बीड, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव,नांदेड, अहमदनगर आदी ठिकाणी सेवा बजावली आहे. मे महिन्यात त्यांची नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे उप विभागीय अधिकारी म्हणून बदली झाली आहे.