शीतलकुमार कांबळे
सोलापूर - आपल्या हक्काच्या घरात राहणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्पप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर मेहनत करावी लागते. या मेहनतीला शासन मदत करत असून, मार्च महिन्याअखेर घरकुल योजनेतील ४८ हजार घरे पूर्ण होणार आहेत.
घरकुल योजनेंतर्गत सोलापूर जिल्ह्यात ४८ हजार घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी ४३ हजार घरकुले बांधण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी ३२ हजार घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. अपूर्ण असणाऱ्या घरकुलांची कामे येत्या महिन्याभरात पूर्ण करा, अशा सूचना जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी दिली.11 हजार घरकुलांसाठी पाठपुरावा
घरकुलांसंदर्भात कोहिनकर यांनी शुक्रवारी (१० मार्च) जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात ४३ हजार घरकुलांच्या बांधणीचे उद्दिष्ट असून, आजपर्यंत ३२ हजारांच्या आसपास घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे तर १२ हजारांच्या आसपास घरकुल बांधकामे प्रलंबित आहेत.