ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. १२ - पाचशे, हजाराच्या नोटांवरील सर्जिकल स्ट्राईकनंतर बँकांचे एटीएम सेंटर्स सुरू होऊन दोन दिवस झाले तरी रक्कम नसल्यामुळे आणि तांत्रिक कारणांमुळे ग्राहकांना त्यांचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या ‘एटीएम’ अन्य कोणत्याही बँकेचे एटीएम आज दिवसभर चालले नाहीत.
बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँकेसारख्या मोठ्या राष्ट्रीयकृत बँकांनाही ही आधुनिक सेवा व्यवस्थितपणे ग्राहकांना देता आली नाही.दरम्यान, दुसºया शनिवारची सरकारी सुटी असल्यामुळे बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी दिसून आली. सहकारी बँकांमध्ये सकाळी तासभर लोकांना रकमा मिळाल्या; मात्र दिवसभर केवळ पैसे भरून घेण्याचेच काम या बँकांमध्ये सुरू होते.
पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतर बँकेच्या सुटीच्या दुस-या दिवशी एटीएम सेंटर्स सुरू झाले खरे;
पण पहिल्या दिवशी शुक्रवारी ते व्यवस्थितपणे सुरू झाले नाहीत. ग्राहकांना वाटले दुस-या दिवशी तरी ‘एटीएम’ मधून रक्कम मिळेल ;पर त्यांनी आजही दगा दिल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठ्या आर्थिक गैरसोयीला सामोरे जावे लागले.
गेल्या दोन दिवसांप्रमाणेच आज सकाळी एटीएम सेंटर्स सुरू होण्यापूर्वीच त्यांच्या गेटसमोर ग्राहकांना रांगा लावल्या होता. बँक आॅफ इंडियाच्या एटीएम सेंटर्समध्ये केवळ रक्कम डिपॉझिट केली जात होती.
महाराष्टÑ बँकेचे एटीएम सेंटर्स काल सुरू होते;पण आज त्यांनी ग्राहकांना दगा दिला. एचडीएफसी बँकेचे एटीएम बंदच असल्याचे निदर्शनास आले. आयसीआयसीआय बँकेचे सेंटर्स दुपारी सुरू होती, असे बँकेत सांगण्यात आले. दुपारी तीनच्या सुमारास या बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये रक्कम भरण्यासाठी वाहन आल्याचे दिसून आले. सोलापूर जनता सहकारी बँक, समर्थ बँक, सिध्देश्वर बँक आदी मोठ्या सहकारी बँकांचे एटीएम सेंटर्स बंदच होते.
सिध्देश्वर बँकेचे सरव्यवस्थापक राम शर्मा यांनी सांगितले की, आमच्या बँकेने गेल्या दोन दिवसात सुमारे ३५ कोटी रूपयांचे वाटप केले. आता आमच्याकडे ३० ते ४० लाख रूपये शिल्लक आहे; पण आम्हाला स्टेट बँकेकडून पुरेसा चलन पुरवठा होत नसल्यामुळे ग्राहकांना सेवा देण्यात अडचणी येत आहेत. समर्थ बँकेचे संचालक प्रशांत बडवे यांनी सांगितले की, नवीन नोटांनुसार ‘एटीएम’ चे सेटींग व्हायला विलंब होत असल्यामुळे आमच्या ग्राहकांना ‘एटीएम’ सेवा मिळू शकत नाही; पण लवकरच ते सुरू होतील.
स्टेट बँकेची रसद
सहकारी बँकांकडे नवीन नोटांचा पुरवठा अल्प प्रमाणात होतो तसेच या बँकांजवळ ५० व १०० रूपयांच्या नोटाही उपलब्ध नसल्यामुळे ग्राहकांना पाचशे, हजार रूपयांच्या नोटांच्या बदल्यात नवीन चलन मिळणे मुश्किलीचे झाले आहे. बॅक उघडल्यानंतर तासाभरातच नवीन चलन संपते. त्यामुळे ग्राहकांना हात हालवत परत यावे लागते. यासंदर्भात बोलताना सिध्देश्वर बँकेचे सरव्यवस्थापक राम शर्मा म्हणाले की, सहकारी बँकांना कोणी वालीच नाही. दरम्यान, या बँकांची समस्या पाहाता स्टेट बँकेच्या ट्रेझरी शाखेकडून प्रत्येक दररोज बँकेला १० ते १५ लाख रूपये दिले जातात; पण सहकारी बँकांही मोठ्या असल्यामुळे त्यांना ही रक्कम पुरत नाही.
आणखी पंधरा दिवस हवेत!
एका वरिष्ठ बँक अधिका-याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले की, पंतप्रधानांनी अनपेक्षितपणे हा निर्णय जाहीर केल्यामुळे रिझर्व्ह बँकेची तारांबळ झाली. या बँकेच्या प्रमुखाला हा निर्णय ठाऊक असला तरी बँकेकडे १०० रूपये आणि ५० रूपयांच्या नोटांचा पुरेसा साठा नव्हता. आता तयारी सुरू झाली आहे;पण चलन पुरवठा सुरळीत होेण्यासाठी आणखी पंधरा दिवस लागतील, असा दावा या अधिकाºयाने केला.
प्रमुख बँकांचे बंद एटीएम सेंटर्स...................
बँक ऑफ इंडिया२६ (केवळ डिपाईझिट)
बँक ऑफ महाराष्ट्र १३
जनता बँक०८
सिध्देश्व बँक०७
सुरू राहिलेले एटीएम सेंटर.........................
स्टेट बँक१६
सिंडीकेट बँक०३
आयसीआयसीआय०९