यावेळी पोलिसांची चांगलीच पळापळ झाली. विद्यार्थ्यांनी अचानक केलेल्या आंदोलनामुळे प्रशासनाधिकारी आणि विद्यार्थी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. घोषणाबाजीमुळे अख्खे कार्यालय दुमदुमून गेले. पीएससी समन्वय समितीचे महेश घरबुडे व शर्मिला येवले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार आघाडी शासन अस्तित्वात आल्यापासून एमपीएससीद्वारे शासकीय नोकरी मिळविणे स्पर्धा परीक्षार्थींना दिवास्वप्नच बनून राहिले आहे. दोन वर्षांपासून या शासनाने फक्त एकच राज्यसेवेची परीक्षा घेतली आहे. कोरोना, मराठा आरक्षण तर कधी शासकीय खर्चात कपात असे कारण देऊन विविध शासन आदेश काढत सर्व भरतीप्रक्रिया बंद करून टाकल्या आहेत. महापरीक्षा पोर्टल बंद करून आपण परत त्याच प्रकारच्या आयटी कंपन्यांना गट-क आणि गट-ड च्या परीक्षा देऊन विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास केला आहे. कोरोनामुळे आधीच हवालदिल असलेला विद्यार्थी आपल्या या सर्व निर्णयामुळे हा नैराश्यात गेला आहे, यामुळेच महाराष्ट्रात कितीतरी स्पर्धा परीक्षार्थींनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे सरकारकडे आमच्या पुढील मागण्या मान्य कराव्यात अन्यथा मंत्रालयावरून उडी मारू, असा इशारा यावेळी महेश घरबुडे यांनी दिला.
..या आहेत मागण्या
यावेळी विद्यार्थ्यांनी प्रमुख मागण्या केल्या आहेत.
यामध्ये एमपीएससी संयुक्त पूर्वपरीक्षेची तारीख जाहीर करावी.
एमपीएससीच्या सर्व नवीन जाहिराती व त्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात यावे.
विविध परीक्षेत प्रलंबित नियुक्त्या देऊन प्रलंबित मुलाखती घेण्यात याव्या.
सरळसेवा परीक्षा खासगी आयटी कंपन्यांमार्फत न घेता एमपीएससीमार्फतच घ्यावी.
----
पोलिसांची दक्षता; सुरक्षा जाळीमुळे वाचले
सर्व मागण्या तातडीने पूर्ण करण्यात याव्यात, अशी मागणी शर्मिला येवले या विद्यार्थिनीने केली. यावेळी करमाळा तालुक्यातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील आणि उभ्या महाराष्ट्रातून आलेले अनेक विद्यार्थी या आंदोलनात सामील झाले होते. वेळेत पोलीस पोहचले नसते तर आणखी एका विद्यार्थ्याचा बळी गेला असता. सुरक्षा जाळी लावल्यामुळे शर्मिला येवले ही विद्यार्थिनी वाचली. घरबुडे हे करमाळा तालुक्यातील मिरगव्हाण येथील रहिवासी असून, ते स्वत: एमपीएससीची परीक्षा देत आहेत.
फोटो जिल्हा सोलवर मेल केला आहे.