शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

जागेच्या वाटणीकरुन खुनाचा प्रयत्न, करणाऱ्या चौघांना पाच वर्षे सक्तमजुरी

By विलास जळकोटकर | Published: May 15, 2024 8:10 PM

जखमी फिर्यादी बंदगी हुसेनबाशा सिंगीकर (वय- ३५, बसवेश्वर नगर, नई जिंदगी, सोलापूर) यास एक लाख रुपये नुकसान भरपाईचा आदेश बजावला. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांच्या समोर या खटल्याची सुनावणी झाली.

सोलापूर : जागेच्या वाटणीवरुन तरुणाचा तलवारीने खुनी हल्ला करण्याचा प्रयतत्न करणाऱ्या चौघांना येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच वर्षाची सक्तमजयुरीची शिक्षा ठोठावली. जखमी फिर्यादी बंदगी हुसेनबाशा सिंगीकर (वय- ३५, बसवेश्वर नगर, नई जिंदगी, सोलापूर) यास एक लाख रुपये नुकसान भरपाईचा आदेश बजावला. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांच्या समोर या खटल्याची सुनावणी झाली.जहाँगीर लालसाब सिंगीकर (वय- ५४), अबतलाह जहाँगीर सिंदगीकर (वय- २५), जैद जहाँगीर सिंदगीकर (वय- २९), अबुबखर जहाँगीर सिंदगीकर (वय- २७, सर्व रा. सिद्धेश्वर पेठ, सोलापूर ) अशी शिक्षा सुनावलेल्या चौघा पिता पूत्रांची नावे आहेत.या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, फिर्यादी बंदगी सिंदगीकर हे १३ सप्टेबर २०२१ रोजी दुपारी चारच्या सुमारास सिद्धेश्वर पेठेत आरोपीच्या घरी गेले असता त्यांच्या सोबत त्यांचे अन्य नातेवाईक त्यांच्या घराच्या वाटणीच्या चर्चेसाठी गेले होते. चर्चेच्या दरम्यान आरोपी व फिर्यादीमध्ये वाद झाला. त्यामुळे त्यातील फिर्यादी व त्यांचे नातेवाईक हे आरोपीच्या घरातून बाहेर निघून गेले. फिर्यादीचे काका लतिफ सिंदगीकर यांचा मुलगा मयत झाल्याने त्याचा दहाव्याचा कार्यक्रम असल्याने फिर्यादी व त्याचे नातलग हे त्यांच्या घरी सांत्वन करण्यासाठी चालले असता घराच्या वाटणीच्या कारणावरुन यातील आरोपी क्र. १ जहांगीर याने फिर्यादीला उद्देशून ‘इसकोच खतम करो, येच मेन काटा है.’ असे म्हणाल्याने सर्वांनी फिर्यादीला पकडून तलवारीने ठार मारण्याच्या उद्देशाने खुनी हल्ला केला. कटावणी, लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यात मारले. फिर्यादीचा भाचा महिबूब बागवान हा अडवण्यासाठी मध्ये आला असता त्याच्यावरही तलवारीने हल्ला केला. या प्रकरणी जखमीच्या फिर्यादीनुसार फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नमूद चौघांविरुध्द गुन्हा नोंदला होता. तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.या प्रकरणात सरकार जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंह राजपूत यांनी मूळ फिर्यादीच्या वतीने ॲड. एम. ए. इनामदार तर आरोपींच्या वतीने ॲड. मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले.या प्रकरणाचा तपास फौजदार अश्विनी काळे यांनी कोर्ट पैरवी म्हणून विक्रांत कोकणे यांनी काम पाहिले.आठ साक्षीदार तपासलेसदर प्रकरणामध्ये सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिलांनी एकूण आठ साक्षीदार तपासले. त्यात दोन जखमी नेत्र साक्षीदार,पंच, वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली.सरकार पक्षाचा युक्तीवाद..जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी युक्तीवादात दोन्ही जखमींच्या कपडयांवर आरोपींचा रक्तगट मिळून आला. सदरचा हल्ला हा आरोपींनी जाणून-बूजून फिर्यादीला व त्यांच्या नातेवाईकांना ठार मारण्याच्या उद्देशानेच केला होता. घराच्या वाटणीच्या कारणावरुन यातील आरोपी क्र. १ जहांगीर याने फिर्यादीला उद्देशून‘इसकोच खतम करो, येच मेन काटा है.’ असे म्हणून इतर सहआरोपींना गून्हा करण्यास प्रवृत्त केले व फिर्यादीवर प्राणघातक हल्ला केला. हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.न्यायाधीशांनी सुनावली शिक्षादोन्ही पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे सर्व आरोपींना भा.दं. वि. कलम ३०७ अन्वये पाच वर्षे सक्त मजूरीची शिक्षा व १ हजार रु. दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास ३० दिवसांचा साध्या कारावासाची शिक्षा तसेच कलम ३२३ अन्वये सहा महिने व ५०० रुपये दंड आणि तो न भरल्यास १५ दिवसांचा साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच कलम ५०६ अन्वये सहा महिने ५०० रु. दंड सुनावला. यातील फिर्यादीला व जखमी यांना चारही आरोपींनी प्रत्येकी रक्कम १५ हजार रुपये अशी एकूण रक्कम १ लाख २० हजार एवढी नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.

टॅग्स :Courtन्यायालयjailतुरुंग