त्यानंतर रविवारी दिवसभर पंतांच्या वाड्यावर त्यांनी हजेरी लावत विजयी गुलाल उधळला. त्यानंतर विजयी प्रमाणपत्र घेण्यासाठी आ. प्रशांत परिचारक, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, उमेश परिचारक, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत मतमोजणी केंद्रावर पोहोचले. विजयी प्रमाणपत्र घेतल्यानंतर त्यांनी अपेक्षेप्रमाणे पंढरपूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह इतर महापुरुषांना अभिवादन करत जल्लोष साजरा केला.
छत्रपती शिवाजी चौकात आल्यानंतर त्यांनी आमदार परिचारकांसोबत छत्रपतींच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले. त्यानंतर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी खालून जल्लोष साजरा करत हाबडाऽऽ हाबडाऽऽऽ म्हणत परिचारकांना शड्डू ठोकण्याची गळ घातली. प्रथम परिचारकांनाही काय करावे कळेना. मात्र, कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर त्यांनीही मोठ्या दिमाखात पुतळ्यासमोर शड्डू ठोकला.
दुसऱ्या दिवशी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याची दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होती.
स्व. भारत भालकेंची शड्डू ठोकल्याची आठवण
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत स्व. भारत भालके हे स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्याविरोधात निवडणूक लढवित होते. त्यावेळीही अगदी तिकीट घेण्यापासून प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे जाईपर्यंत स्व. भारत भालके हे अडचणीत असल्याच्या अफवा पसरविल्या जात होत्या. निवडणुकीतही ते पंतांसमोर टिकणार नाहीत, अशा अनेक चर्चा मतदारसंघात रंगल्या. मात्र, प्रत्यक्ष निवडणूक निकाल लागल्यानंतर भारत भालके तब्बल १२ हजार मतांचे मताधिक्य घेऊन विजयी झाले. त्यानंतर भारत भालकेंची पंढरपुरात जंगी विजयी मिरवणूक निघाली होती. त्यावेळी भारत भालकेंनी जीपच्या बॉनेटवर उभारून व छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर शड्डू ठोकले होते. त्याचठिकाणी आ. परिचारकांनी शड्डू ठोकल्यामुळे भारत भालकेंच्या शड्डू ठोकल्याच्या प्रसंगाची आठवण झाली.
फोटो लाईन :::::::::::::::::::::::
भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या विजयानंतर आ. प्रशांत परिचारक यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर शड्डू ठोकल्याचे छायाचित्र.