कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ भाजप, रयत क्रांती संघटना, रासप, आरपीआय, बळीराजा शेतकरी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन विठ्ठल -रुक्मिणी मंदिराला शनिवारी प्रदक्षिणा मारली. यावेळी दीपक भोसले, ॲड. किर्तीपाल सर्वगोड, सुभाष मस्के, विक्रम शिरसट यांच्यासह सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कृषी विधेयकाच्या विरोधात देशातील विरोधक एकत्र झाले आहेत. ते शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ७० वर्षानंतर आमच्या पायातील बेडी तुटली आहे. त्यांना सद्बुद्धी दे ! असे साकडे पांडुरंगाकडे घातल्याचे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
अन् चालणे उलट्या दिशेला असेल यालाच बारामतीकर म्हणतात
२००६ साली ज्यांनी करार शेती विधेयक विधानसभा व विधानपरिषदेत मंजूर केले. ते या कायद्याला विरोध करत आहेत. आपल्या शेतीवर आम्ही करार पद्धतीने शेती करत आहोत. शेतकऱ्यांनी संपर्क करावा, असे फलक ज्यांनी लावले, तेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दृष्टांत झाला, की हे कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. हे त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे. यामुळे लोक आत्मचरित्र्य वाचणे बंद करतील. आत्मचरित्र्य एक असतं अन् चालणे उलट्या दिशेला असेल यालाच बारामतीकर म्हणतात, असा टोला सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना लगावला.
फोटो
१३पंढरपूर-भजन
ओळी
श्री विठ्ठल मंदिर परिसरात भजन करताना माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ. गोपीचंद पडळकर, आ. प्रशांत परिचारक व अन्य कार्यकर्ते.