शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

अबब ! गायीच्या पोटात निघाला १०० किलो कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 11:45 AM

तीन तास शस्त्रक्रिया, प्लास्टिकसह अनेक वस्तूंचा समावेश

ठळक मुद्दे शस्त्रक्रियेद्वारे पोटातून प्लास्टिक, खिळे, काचा अशा अनेक वस्तू बाहेरमृत्यूशय्येवर असलेल्या गायीला जीवदानशस्त्रक्रियेत चार पदर मिळून एकूण १०० टाके घालण्यात आले. 

सोलापूर : पूर्व भागातील जय संतोषी माता गोशाळेत कोंडवाड्यातून आणून सोडलेल्या गायीच्या पोटात १०० किलोचा कचरा निघाला आहे. तीन तास चाललेल्या शस्त्रक्रियेद्वारे पोटातून प्लास्टिक, खिळे, काचा अशा अनेक वस्तू बाहेर निघाल्यामुळे मृत्यूशय्येवर असलेल्या गायीला जीवदान मिळाले आहे.

महानगरपालिकेच्या कोंडवाड्यात बेवारस जनावरांना आणून ठेवले जाते. यामध्ये गायींचे प्रमाण मोठे असते. ठराविक कालावधीत मूळ मालकाने ओळख पटवून गायी न नेल्यास गोशाळेला दान करण्यात येतात. अशाच प्रकारातील पाच गायी २६ आॅगस्ट रोजी जय संतोषी माता गोशाळेला महापालिकेच्या वतीने देण्यात आल्या. पाचपैकी एक गाय गेल्या चार दिवसांपासून आजारी होती. बुधवारपासून गायीने हालचाल करणे बंद केले होते. 

डोळेही पांढरे झाले होते. काहीतरी गंभीर आजार झाल्याचे लक्षात आल्याने गोशाळा चालकाने डॉक्टरांना पाचारण केले. डॉ. विश्वजित बडगेरी आणि त्यांचे सहकारी डॉ. अतकर यांनी गायीला तपासून तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. परंतु सायंकाळी गायीची प्रकृती अधिकच खालावल्याने गुरुवारी सायंकाळी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३० या दरम्यान शस्त्रक्रिया करून जवळपास गायीच्या पोटातून १०० किलोचा कचरा काढण्यात आला. या शस्त्रक्रियेमुळे मृत्यूशय्येवर असलेल्या गायीला जीवनदान मिळाले आहे.

...तर चारा खात नाही- रस्त्यावर भटकणाºया बेवारस गायींना प्लास्टिक आणि तत्सम पदार्थ खाण्याची सवय लागलेली असते. अशा गायी सकस आहार म्हणजे चारा किंवा भुसा खात नाहीत. त्यामुळे गोशाळेत आणल्यावर अनेक वेळा उपाशी राहून त्यांच्यावर प्राण गमवायची वेळ येते, अशी माहिती डॉ. गाजूल यांनी दिली.

शस्त्रक्रियेत १०० टाके- गायीच्या पोटात खिळे, बांगड्या, पैशाची नाणी, प्लास्टिकच्या पिशव्या, इलेक्ट्रिक साहित्य, नारळाच्या वाट्या, पेन्सिल, खोडरबर अशा अनेक वस्तू आढळल्या. तीन तास चाललेल्या शस्त्रक्रियेत चार पदर मिळून एकूण १०० टाके घालण्यात आले. 

घरातील शिळे अन्न एका प्लास्टिकच्या पिशवीत एकत्र करून रस्त्यावर टाकले जाते. त्याच पिशवीत, बांगड्या, खिळे, नारळाच्या वाट्या आणि इतर सर्व प्रकारचा कचरा असतो. हे शिळे अन्न गाय पिशवीसह खाते. त्यामुळे पोटात कचरा साठतो. लोकांनी कचरा टाकताना मुक्या जनावरांच्या जीवाला धोका होऊ नये, यासाठी केवळ शिळे अन्न टाकावे.- डॉ. राजेंद्र गाजूल, चालक, जय संतोषी माता गोशाळा

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरcowगाय