शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

भीमा, सीना, माण नदीवरील वाहून जाणारे पाणी रोखण्याचा प्रयत्न, बंधाºयांना बसणार स्वयंचलित दरवाजे, जलसंपदामंत्र्यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:12 AM

जिल्ह्यातील भीमा, सीना आणि माण नदीच्या पात्रातील चार कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयांवर प्रायोगिक तत्त्वांवर स्वयंचलित दरवाजे बसविण्यात येतील. यासाठी आवश्यक असलेले अंदाजपत्रक लघू पाटबंधारे विभागाला सादर करण्याचे आदेश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.

ठळक मुद्देभीमेतून वाहून जाणारे लाखो लिटर पाणी वाचविण्यास मदतसोलापूर जिल्ह्यातील पाणी प्रश्नाबाबत जलसंपदा राज्यमंत्री शिवतारे यांनी पुण्यात बैठकजलसंपदा राज्यमंत्र्यांनी प्रायोगिक तत्त्वावर चार ठिकाणी काम करण्याचे आश्वासन दिले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १७  : जिल्ह्यातील भीमा, सीना आणि माण नदीच्या पात्रातील चार कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयांवर प्रायोगिक तत्त्वांवर स्वयंचलित दरवाजे बसविण्यात येतील. यासाठी आवश्यक असलेले अंदाजपत्रक लघू पाटबंधारे विभागाला सादर करण्याचे आदेश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली. हे काम झाल्यास भीमेतून वाहून जाणारे लाखो लिटर पाणी वाचविण्यास मदत होईल. कालव्यातून अर्धे आवर्तन वाचेल, असेही त्यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील पाणी प्रश्नाबाबत जलसंपदा राज्यमंत्री शिवतारे यांनी पुण्यात बैठक घेतली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार बबनराव शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख, लाभक्षेत्र प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता शिवाजी चौगुले यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.आमदार शिंदे म्हणाले की, आघाडी सरकारच्या काळातच आम्ही बंधाºयांना स्वयंचलित दरवाजे बसविण्याची मागणी केली होती. तत्कालीन जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे यांनी सर्वेक्षण करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. सरकार बदलले, विषय मागे पडत होता. पुन्हा पाठपुरावा सुरू  केला. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकारातून आजची बैठक झाली. जलसंपदा राज्यमंत्र्यांनी प्रायोगिक तत्त्वावर चार ठिकाणी काम करण्याचे आश्वासन दिले आहे. पुणे जिल्ह्यातील दौंडजवळ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयाचे बॅरेजेसमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. याचा अभ्यास करून अंदाजपत्रक मांडण्याची सूचना करण्यात आली. -------------------यासाठी आवश्यक आहेत स्वयंचलित दरवाजे- जिल्ह्यातील अनेक कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयांबाबत तक्रारी येतात. बंधाºयांना गळती लागलेली असते.  पाटबंधारे विभागाचे अधिकारी पावसाळ्यानंतर या बंधाºयांना वेळेवर दरवाजे लावून पाणी अडवित नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जाते. कोल्हापूर बंधाºयांना स्वयंचलित दरवाजे बसविण्यासाठी त्यांची रचना बदलावी लागते. स्वयंचलित दरवाजांमुळे गळती तर थांबतेच शिवाय भीमा नदीतून वाहून जाणारे पाणी रोखण्यास मदत होईल. ---------------येथे होणार काम - पंढरपूर तालुक्यात पुळूज (भीमा नदी), सिद्धेवाडी (माण), माढा तालुक्यातील कव्हे आणि रिधोरे (सीना नदी).--------------------------------------कारंबा पंपगृहाचे काम तीन महिन्यात- पालकमंत्री देशमुख यांच्या मागणीनुसार कारंबा येथील पंपगृहाच्या कामाची निविदा १५ दिवसात काढावी. तीन महिन्यात काम पूर्ण करू न सोलापूरला पाणी उपलब्ध करून द्यावे. टाकळी आणि वडकबाळ येथे रस्ता व बंधाºयाचा प्रस्ताव केंद्राला सादर करण्याच्या सूचना केल्या. 

टॅग्स :Vijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुख