सोलापूर - सोलापूर विकास मंचच्या सातत्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण पाठपुराव्याकडे महाराष्ट्र शासनाचे आहे बारकाईने लक्ष आहे. लवकरच होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करणार असल्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी सोलापूरकरांच्या तीव्र भावना गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर विकास मंचच्या वतीने केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवर अभ्यासपूर्ण आणि सातत्याने पाठपुरावा करुन सुरू आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूरातील टेलरिंग व्यवसाय करणारे ७२ वर्षीय अर्जुन रामगिर यांनी ८ मार्च २०२३ पासून आत्मक्लेष पदयात्रा प्रारंभ करुन २८ मार्च २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील वर्षा ह्या शासकीय बंगल्यात भेट घेतली.
सोलापुरात सर्व सुविधांनी उत्कृष्ट विकसित एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या देखरेखीखाली असलेल्या होटगी रोड विमानतळावरून भारत सरकारच्या उडान योजने अंतर्गत सदर विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी दोन वेळा निवड होऊनही सामान्य सोलापूरकरांना नागरी विमानसेवा उपलब्ध होऊ न शकल्याने सोलापूरकरांच्या तीव्र भावना ईमेल, प्रशासनाच्या विविध विभागां अंतर्गत प्राप्त शेकडो पत्र आणि निवेदनाद्वारे आमच्या पर्यंत पोहचत असलेल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूर विकास मंचचे सदस्य अर्जुन रामगिर यांना सांगितले.