भगीरथ भालके अध्यक्ष असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे ३६ कोटी रुपयांची ऊस बिले थकविली आहेत, तर समाधान आवताडे अध्यक्ष असलेल्या दामाजी सहकारी साखर कारखान्याने ४५ कोटी रुपयांची एफआरपी थकविली आहे. शासकीय देणी थकविल्यामुळे साखर कारखान्याची मालमत्ता विकून शेतकऱ्यांची बिले अदा करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत. शासकीय येणे बाकी थकीत असलेले आरआरसीअंतर्गत कारवाई केलेली आहे. या शासकीय देण्यास भाजपचे समाधान आवताडे व राष्ट्रवादीचे भगीरथ भालके हे जबाबदार आहेत. यामुळे निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई करून या दोघांचे अर्ज नामंजूर करावेत, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने मोहन हळणवार व स्वाभिमानी संघटनेचे सचिन पाटील यांनी केली आहे.
----
मी समाधान आवताडे व भगीरथ भालके यांच्या विरुद्ध निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती; परंतु समाधानकारक सुनावणी झाली नाही. यामुळे न्यायालयात दाद मागणार आहे.
- सचिन पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटना
कोट : भगीरथ भारत भालके व समाधान महादेव आवताडे यांच्या उमेदवारी अर्जावर हरकती घेण्यात आल्या होत्या. त्या हरकती फेटाळून दोघांचे अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत.
- गजानन गुरव, निवडणूक निर्णय अधिकारी, पंढरपूर.