आमदार गोपीचंद पडळकर यांनी आवाहन केल्यानुसार कुरुल येथील सुहास घोडके व महादेव धर्मशाळे यांनी डोक्यावर फेटा, धोतर, खांद्यावर घोंगडी, हातामध्ये काठी आणि कपाळी पिवळा भंडारा अशा पद्धतीने पारंपरिक वेशभूषा धारण केले होते. धनगर गल्ली येथील श्री विठ्ठल मंदिरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब लांडे, बाबासाहेब जाधव, राजकर्ण घोडके, उमाकांत घोडके, प्रमोद वाघमोडे, संजय घोडके, गणेश घोडके, सचिन कोकाटे, अण्णा घोडके, समाधान दुधाळ, भैया खरात, श्रावण घोडके, समाधान लंबाटे, सीताराम घोडके, संजय घोडके, धनाजी सलगर, ओंकार घोडके, आदी उपस्थित होते.
----
ग्रामपंचायत कार्यालयात प्रतिमा पूजन
कुरुल ग्रामपंचायत कार्यालयास ग्रामपंचायत सदस्या मोहिनी घोडके यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा भेट दिली. या प्रतिमेचे पूजन पंचायत समितीचे सदस्य जालिंदरभाऊ लांडे, सरपंच पती माणिक पाटील, उपसरपंच पांडुरंग जाधव, ग्रामविकास अधिकारी जे. एस. भोसले, डॉ. आर. एन. माने, संतोष जाधव, अमोल खंदारे, संभाजी घोडके, खाजाभाई शेख, आदी उपस्थित होते.
----
फोटो : ३१ कुरूल
कुरूल येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आरक्षणाचा जागर करताना ग्रामस्थ.