वैराग : कोरोनाचा एवढा इतक्या मोठ्या प्रमाणात झाला की भले भले लोक अडचणीत आले. उन्हाळा पावसाळ्याच्या दुष्काळात होरपळणारा शेतकरीही भरडून निघाला. दुसऱ्या वर्षीही सावटाखाली हा सण साजरा करीत असताना जगाचा पोशिंदा न डगमगता बैलांच्या शरीरावरून जनजागृतीपर वाक्ये लिहून प्रबोधन केल्याचा अफलातून प्रकार बार्शी तालुक्यात जवळगाव येथे पाहायला मिळाला.
पोळा या सणाला शेतक-यात अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यानिमित्ताने जवळगाव येथील उत्तम कापसे या शेतक-याने बैलाला मास्क घालून व त्याच्या अंगावर कोरोनाविषयी जनजागृतीपर संदेश लिहिले. त्यानंतर गावातून बैलांची मिरवणूक काढली. यातून शेतकऱ्यांत किती संवेदनशीलता आहे हे दिसून येते. गत वर्षापासून कोरोनाचे सावट असल्यामुळे प्रत्येक सण अत्यंत साध्यापणाने साजरा करण्यात येत आहे. शेकऱ्यानेही कोरोनाचे संकट ओळखून या सणांमधून कोरोनाची जनजागृती केली आहे.
बैलपोळा या सणाकडे शेतकऱ्यासाठी दिवाळी म्हणून पाहिले जाते. मात्र, गतवर्षीप्रमाणे यंदादेखील शेतकऱ्यांच्या या सणावरती कोरोनाचे सावट आहे. त्याच अनुषंगाने बार्शी तालुक्यातील जवळगाव येथील शेतकरी उत्तम कापसे यांनी कोरोनाची जनजागृती केली.
---
सोन्या अन शिल्या म्हणतात...तिसरी लाट टाळा
बैलांच्या पाठीवरती "कोरोनाचे नियम पाळा तिसरी लाट टाळा", 'लस घ्या कोरोना टाळा","गो कोरोना गो" असं लिहित कोरोनाविषयी जागरूक रहा आणि कोरोनाला हद्दपार करा असा संदेश देण्यात आला आहे. साध्या पद्धतीने बैलपोळा सण साजरा करत गेल्या ४५ वर्षांपासूनची बैलपोळा सणाची परंपरा त्यांनी खंडित होऊ दिलेली नाही. सोन्या आणि शिल्या या बैलांवर केलेली रंगरंगोटी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यांनी केलेल्या या अनोख्या बैलपोळ्याचं सगळीकडे कौतुक होत आहे.
---
महाराष्ट्रात कोरोनामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. भाजीपाल्याला दर राहिला नाही. कोरोना लवकरात लवकर निघून जावा. जगाचा पोशिंदा जगला तरच भलं होईल ही भावना मनात आली. त्यामुळे बैलामार्फत संदेश दिला.
- अविनाश कापसे
शेतकरी
----
फोटो : ०६ वैराग १
जवळगावात बैल पोळ्याला पोटावर जनजागृतीपर संदेश देत शेतकऱ्यांनी कोरोना हटावा, असा संदेश दिला.
----
०६ कोंडी
बैलपोळ्यानिमित्त कोंडी येथील गणेश पाटील या शेतकर्यांने हा संदेश दिला.बैलपोळ्यानिमित्त कोंडी येथील गणेश पाटील या शेतकर्यांने हा संदेश दिला.