शीतलकुमार कांबळे, सोलापूर: संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात पंढरपूर तालुक्यातील भोसे ग्रामपंचायतीस आबासाहेब खेडकर विशेष पुरस्कार जाहीर झाला. या ग्रामपंचायतीने लोकसहभागातून विविध उपक्रम राबविले. त्याची दखल घेऊन शासनाने हा पुरस्कार जाहीर केला.
भोसे गावामध्ये लोकसहभागातून २० लाख रूपये गोळा करून रुग्णवाहिका सुरू केली. आझादी का अमृत महोत्सव तसेच विविध नावीण्यपूर्ण उपक्रम सा ग्रामपंचायतीने राबविले. क्युआर कोडद्वारे ग्रामपंचायतीचा टॅक्स जमा करण्यात आला. यात सातत्य ठेवले. त्यामुळे पुरस्कारासाठी गावाची निवड झाली.
या पुरस्काराबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी सरपंच गणेश पाटील व ग्रामविकास अधिकारी शरद भुजबळ यांचे अभिनंदन केले आहे.
विभागीय उपायुक्त विजय मुळीक व त्यांचे सहकारी टीमने या गावाची पाहणी केली होती. गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांचे देखील या ग्रामपंचायतीच मोलाचे सहकार्य मिळाले. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात ही भोसे ग्रामपंचायत जिल्ह्यात पहिली आहे.