पंढरपूर : ‘बा! विठ्ठला सरकारला शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची सद्बुद्धी दे!’ असे साकडे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पांडुरंगाला घातले़ राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांच्या वतीने निघालेल्या संघर्षयात्रेचे सोमवारी दुपारी पंढरीत आगमन झाले़ त्यानिमित्त इसबावी येथे झालेल्या जाहीर सभेत पवार बोलत होते़ व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, आरपीआयचे प्रा़ जोगेंद्र कवाडे, यांच्यासह आमदार, उपस्थित होते़ यंदा बाजारात कोणत्याच पिकांना योग्य भाव नसल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आला़ कांदा, तूर, ऊस यासह फळांनाही दर नसल्याने शेतकऱ्यांनी जेवढे खर्च केले तेवढेही त्यांच्या हाती पडले नाही़ मग शेतकरी आत्महत्या का करणार नाही? असा सवाल पवार यांनी केला़ आघाडी सरकारने कधीही इतके शेतकऱ्यांचे हाल केले नाहीत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली़ इतर ठिकाणी द्यायला राज्य शासनाकडे पैसे आहेत, पण शेतकऱ्यांविषयी सहानभूती दाखविली जात नाही. कर्जमाफीसाठी ३0 हजार कोटी रुपयाची गरज असून, ही रक्कम राज्य शासनाने कर्जरुपाने उभी करावी अशी मागणी करतांनाच विरोधकांनी काढलेल्या संघर्षयात्रेला वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>खांदेपालट नको; सत्तापालट हवाशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात, आता मंत्र्यांमध्ये खांदेपालट करावा लागणार आहे़ परंतु आता खांदेपालट नकोय तर सत्तापालट करावा लागणार आहे़, असे राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.
बा विठ्ठला... सरकारला कर्जमाफीची सद्बुद्धी दे!
By admin | Published: April 04, 2017 5:48 AM