विकासापासून कोसो दूर राहिलेल्या हिरज (ता. उत्तर सोलापूर) गावाचे मागील पाच वर्षांत रूपच पालटले ते गावाच्या एकीमुळे. तत्कालीन सरपंच पूर्वा वाघमारे, उपसरपंच उर्मिला जन्मले, ग्रामविकास अधिकारी नंदकुमार पाटील व संपूर्ण ग्रामस्थ गावच्या विकासासाठी एकत्र आले. सुभाष डोंगरे या समाजसेवकाने विकासासाठी गावकऱ्यांची बांधलेली मोळी सहाव्या वर्षीही कायम आहे. पाणी फौंडेशनच्या निमित्ताने गावे पाणीदार करण्याची आलेल्या संधीचे हिरजकरांनी सोने केले. ९ एप्रिल २०१७ रोजी हिरजकर एकत्र आले व घाम येईपर्यंत श्रमदान केले. श्रमदानासाठी एकत्र आलेले समजदार लोक आजही दर रविवारी गावची स्वच्छता करतात.
९ एप्रिल रोजी गावचा वाढदिवस साजरी करण्याची परंपरा सुरू केली आहे. दरवर्षी वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम गावच्या वाढदिवसानिमित्त साजरे केले जातात. गावासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम मंजूर करून घेतले व त्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र नळकनेक्शन देण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार घरात नळकनेक्शन नसलेल्या १०० कुटुंबांना या नवीन योजनेची नळजोडणी करून गावच्या वाढदिवसदिनी पाणी देण्यात आले. याशिवाय शालेय विद्यार्थी व युवकांनी वृक्षारोपणही केले.
कोट :::::::::::::
गावासाठी काम करताना माजी सरपंच पूर्वा वाघमारे यांचे मोठे योगदान होते. गावाचा एकोपा आजही कायम असल्याचा आनंद वाटतो. आता गावात विविध प्रकारची झाडे वाढवून सजवायचे आहे.
- इलाही शब्बीर पटेल
सरपंच, हिरज
फोटो अरुण बारसकर यांच्याकडून येणार आहे.