मंगळवेढा : बँकेचे कर्ज न फेडता जर्शी गाईंची परस्पर विक्री केल्याप्रकरणी डोंगरगाव येथील लक्ष्मी कृषी विकास प्रोड्यूसर कंपनीचे संचालक, कर्मचारी व दूध संकलन केंद्राचे चालक अशा नऊ जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायाधीश कमला व्ही. बोरा यांनी मंजूर केला.
सोमनाथ सिद्धेश्वर साखरे (रा. भाळवणी) यांनी कंपनीच्या माध्यमातून समूह गट स्थापन करून विदर्भ कोकण ग्रामीण बँकेकडून जर्शी गाई घेण्यासाठी कर्ज घेतले. ते न फेडताच त्यातील गाई त्यांनी परस्पर विकली. न्यायालयाने कागदोपत्री पुरावे पाहून आकसापोटी दीर्घ विलंबाने खोटा गुन्हा दाखल केल्याची पाहणी करून नऊ अर्जदारांना अंतरिम अटकपूर्व जामीन कायम करून मंजूर केला आहे. या प्रकरणात कंपनी व सर्व अर्जदारातर्फे ॲड. सुहास माळवे, ॲड. दीपक कारंडे, ॲड. योगिराज रुद्रमणी मिठारी (रा. पंढरपूर) यांनी काम पाहिले.