सोलापूर : आठवडाभरापासून सकाळी थंड हवा, दुपारी कडक ऊन आणि रात्रीला पावसाच्या सरी अशा पद्धतीने तीनही ऋतुंचा अनुभव सोलापूरकरांना येतोय़ हाच अनुभव सोमवारी मध्यरात्रीला देखील सोलापूरकरांनी घेतला़ रात्री १२ ते पहाटे अडीच दरम्यान पावसाच्या सरी कोसळल्या़ सोलापूर शहरातही हद्दवाढ भागात पावसाच्या सरी कोसळल्या. पहाटे सव्वा बारा वाजता कुमठे, मजरेवाडी, साखर कारखाना परिसर आणि विजापूर रोड परिसरात रिमझिम पाऊस झाला़ पावसाबरोबरच मातीतून सुगंध दरवळत राहिला़ रात्रीत थंड हवा निर्माण झाली.याच रात्री ग्रामीण भागातही काही ठिकाणी पाऊस झाला. रविवारी मध्यरात्री उत्तर सोलापूर तालुक्यात बीबीदारफळ परिसरात मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. शनिवारीच मार्डी परिसरात गारांचा पाऊस व वादळाने नुकसान झाले होते.याबरोबरच वडाळा, बीबीदारफळ, नान्नज, नरोटेवाडी, कारंबा, होनसळ आणि मार्डी परिसरात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडला होता. रविवारी दिवसभर कडक उन्हाळा जाणवला. रात्री ११़३० वाजेपर्यंत खेळती हवा बंद झाल्याने उकाडा निर्माण झाला होता. त्यानंतर विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. अर्ध्या तासाहून अधिक वेळ पाऊस पडत होता. पुढे हा पाऊस वैराग परिसरातही होता़ वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह जोराचा पाऊस झाला़ -----सांगोल्यात द्राक्षांचे मोठे नुकसान सांगोला तालुक्यात झालेल्या वादळी वाºयाच्या पावसामुळे एखतपूर, वाकी, शिवणे गावातील आठ ते दहा घरावरील पत्रे उडून गेले़ या भागात जवळपास दोन लाख रुपयाचे नुकसान झाले़ गारपीटीमुळे शिवणे येथील ६ ते ७ शेतकºयांच्या ६ हेक्टरवरील द्राक्षाचे मनी गळून पडले़ याच गावातील अनेक शेतक-यांचे डाळींब, कलिंगड, खरबूज, शेवगा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सांगोला तालुक्यात ९ मंडलनिहाय ५६ मि़मी. अवकाळी पाऊस झाला आहे.
अवकाळी पावसाने द्राक्ष, केळी बागा जमीनदोस्त; शेती पिकांचेही झाले नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 2:53 PM
सोलापूर शहरासह सांगोला, मार्डी, वैराग परिसरात मध्यरात्रीत पावसाच्या सरी
ठळक मुद्देवादळी वाऱ्यासह पावसाने लावली जोरदार हजेरीविजेच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरीवीजपुरवठा खंडित, महावितरणचे झाले नुकसान