अरुण बारसकरसोलापूर : पीक कर्ज, फळबागा तसेच ठिबकसाठीच्या कर्जात मोठी काटकसर करणाºया बँकांनी मुद्रा, शैक्षणिक, गोडावून बांधणी व मध्यम व्यवसायासह अन्य बाबींसाठी सढळ हाताने कर्ज दिल्याने २०१६-१७ च्या तुलनेत २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात ६२९ कोटी ८० लाख ७४ हजार रुपये अधिक कर्ज वाटप झाले आहे. एकूणच शेतीविषयक बाबींसाठीच्या कर्ज वाटपात ७३ कोटी ३६ लाख २९ हजार रुपये घट झाली आहे.
बँकांमार्फत शेती व बिगरशेती अशा दोन प्रकारे कर्ज वाटप केले जाते. सोलापूर जिल्ह्यात ३० राष्टÑीयीकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँक, ग्रामीण बँक तसेच खासगी ७ बँकांकडूनही विविध प्रकारचे कर्ज वाटप केले जाते. मागील काही वर्षात जिल्हा बँकेकडून कर्ज वाटपाचे प्रमाण कमी झाले असून, राष्टÑीयीकृत बँका तसेच खासगी बँकांचा कर्जपुरवठा वाढला आहे.
बँकांकडून शेतीविषयक १७ बाबींसाठी तर बिगरशेतीच्या ७ बाबींसाठी कर्ज दिले जाते. जिल्ह्यात वरचेवर शेतीप्रमाणेच बिगर शेतीसाठीच्या कर्जात वाढ होत आहे. १६-१७ च्या तुलनेत १७-१८ या आर्थिक वर्षात कर्ज वाटपाच्या वाढलेल्या आकडेवारीत बिगरशेतीसाठी तब्बल २४३ कोटी ४ लाख ५२ हजार रुपयांचा समावेश आहे. एकीकडे बिगरशेतीसाठी शेतीचे वाटप वाढले असताना पीक कर्ज वाटपात बँकांनी हात आखडता घेतल्याचे आकडेवारीवरुन दिसते.
ग्रीन हाऊससाठी कर्ज वाढले
- - १६-१७ या आर्थिक वर्षात बँकांनी पीककर्ज १ लाख ५७ हजार ३३६ शेतकºयांना २२२३ कोटी ३५ लाख रुपये तर १७-१८ या वर्षात एक लाख ४० हजार ६२४ शेतकºयांना १९६४ कोटी ६१ लाख ९७ हजार म्हणजे २५८ कोटी ७३ लाख रुपये कर्ज कमी वाटले.
- - ठिबक सिंचनसाठी १६-१७ मध्ये १९६ कोटी २२ लाख ७७ हजार रुपये तर १७-१८ मध्ये १४६ कोटी ९० लाख २८ हजार रुपये कर्ज वाटले असून १६-१७ च्या तुलनेत मागील वर्षी ४९ कोटी ३१ लाख ९७ हजार रुपये इतके कमी कर्ज वाटप झाले.
- - शेडनेटसाठीही १६-१७ च्या तुलनेत १७-१८ मध्ये ४ कोटी ४७ लाख ९१ हजार रुपये इतके कर्ज कमी वाटप झाले आहे.
- - ग्रीन हाऊस, पॉलिहाऊससाठी मात्र १६-१७ च्या तुलनेत १७-१८ मध्ये ८४ लाख ७४ हजार रुपये अधिक कर्ज दिले आहे.
- - जमीन विकास, आधुनिक शेतीयंत्र, फळबागांसाठीच्या कर्ज वाटपात वजाबाकीच दिसत आहे.
- - स्टोअरेज, गोडावून, लघू व मध्यम उद्योगासाठी कर्ज देण्यावर बँकांनी भर दिल्याने १६-१७ च्या तुलनेत १७-१८ मध्ये २७० कोटी ५१ लाखांनी कर्ज वाढले आहे.
- - मत्स्य व्यवसायासाठीही बँका कर्ज देऊ लागल्या असून मागील आर्थिक वर्षात २६ लाख रुपये कर्ज दिले आहे.