शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

सोलापूरातील विडी वळणाºया हातांना बाप्पाचा मदतीचा ‘हात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:28 PM

महेश कुलकर्णीसोलापूर : पद्मशाली समाजातील वर्षानुवर्षे विडी वळणाºया महिला त्यातील विषारी घटकांमुळे अनेक दुर्धर आजारांना तोंड देत आहेत. सरकारच्या धूम्रपानबंदीच्या धोरणामुळे हा व्यवसाय पूर्णत: बंद करण्यासाठी प्रयत्न चालू असताना पर्यायी रोजगाराच्या शोधात असलेल्या महिलांना नीलमनगर येथील साई आर्टस्कडून गणरायाच्या मूर्ती रंगविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. हा छोटेखानी व्यवसाय म्हणजे जणू ...

ठळक मुद्देनीलमनगर येथील साई आर्टस्कडून गणरायाच्या मूर्ती रंगविण्याचे प्रशिक्षणसोलापूर शहरात मूर्ती बनविण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणातविडी वळणाºया महिलांना हे प्रशिक्षण फारसे अवघड जाण्याचा प्रश्नच नव्हता

महेश कुलकर्णीसोलापूर : पद्मशाली समाजातील वर्षानुवर्षे विडी वळणाºया महिला त्यातील विषारी घटकांमुळे अनेक दुर्धर आजारांना तोंड देत आहेत. सरकारच्या धूम्रपानबंदीच्या धोरणामुळे हा व्यवसाय पूर्णत: बंद करण्यासाठी प्रयत्न चालू असताना पर्यायी रोजगाराच्या शोधात असलेल्या महिलांना नीलमनगर येथील साई आर्टस्कडून गणरायाच्या मूर्ती रंगविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. हा छोटेखानी व्यवसाय म्हणजे जणू काही गणरायाने दिलेला मदतीचा ‘हात’ ठरला आहे. 

कलेची नगरी म्हणून ओळखल्या जाणाºया सोलापूर शहरात मूर्ती बनविण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. गणेशोत्सव जवळ आला की या व्यवसायातील लगबग वाढते. मूर्ती बनविणे, रंगरंगोटी करणे, डोळ्यांना रंग देणे अशी अनेक कामे जोमाने चालू असतात. या मूर्र्तींना आंध्र प्रदेश, कर्नाटकसह महाराष्टÑातील अनेक मोठ्या गावांतून मागणी असते. 

या व्यवसायात कुशल कारागिरांना मोठा वाव असतो. रंगरंगोटी आणि डोळे रंगविणे हे काम सराव असणाºयांना जमते. परंतु अशा कामगारांची वानवा असल्यामुळे विडी वळणाºया महिलांना ही कला का शिकवू नये, असा विचार साई आर्टस्चे अंबादास दोरनाल, मधुकर कोकुल, बालाजी श्रीराम यांनी केला. विडी कामगार महिलांना प्रशिक्षण देऊन पर्यायी रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रारंभी या तिघांनी घरातील महिलांना प्रशिक्षण दिले. यानंतर नीलमनगर परिसरातील महिलांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.

पूर्व भागातील पद्मशाली आणि इतर तेलुगू भाषिक समाज मूळचे विणकर असल्याने विडी वळणाºया महिलांना हे प्रशिक्षण फारसे अवघड जाण्याचा प्रश्नच नव्हता. आठवडाभरातच अनेक महिलांनी रंगरंगोटीच्या कामाचे प्रशिक्षण घेऊन प्रत्यक्ष काम सुरू केले. तंबाखूपासून बनविण्यात येणाºया विड्यांमुळे बहुतांश महिलांना आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. हाताला घट्टे पडतात. तसेच तंबाखूच्या उग्र वासामुळे श्वसनाचे अनेक विकार होतात. हा व्यवसाय करण्यापेक्षा गणेश मूर्तीला रंगरंगोटी करणे अधिक सोपे आणि मानाचे काम असल्यामुळे अनेक महिलांनी याठिकाणी मोफत प्रशिक्षण घेण्यासाठी गर्दी केली. सध्या ५० हून अधिक महिलांनी अशा प्रकारचे प्रशिक्षण घेतले असून सध्या गणेशोत्सव जवळ आल्यामुळे मोठ्या प्रमाणात हे काम चालू आहे.

वर्षभर रोजगारसोलापूरमधील गणेश मूर्तींचा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात असतो. सुबक आणि सुंदर मूर्ती कमी उत्पादन खर्चात येथे बनविल्या जातात. मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, पुणे यांसारख्या शहरातून गणेश मूर्र्तींना मोठी मागणी असते. येथून नेलेल्या मूर्ती तेथे तिप्पट किमतीने विकल्या जातात. सोलापुरात जवळपास १५० ते २०० मूर्तिकार आहेत. हे सर्व जण मिळून दीड लाखाच्या आसपास गणेश मूर्ती दरवर्षी बनवित असतात. यातील सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठी ४० हजार मूर्ती वगळल्या तरी एक लाखापेक्षा अधिक मूर्ती परगावी जातात. यामुळे हा व्यवसाय वर्षभर चालत असतो. विडी कामगारांना काही प्रमाणात पर्याय निर्माण करणारा हा रोजगार नक्कीच आहे.

या महिलांकडून प्रशिक्षणगणेश मूर्तींना रंगरंगोटी करण्याचे काम साई आर्टस्च्या वतीने सपना श्रीराम, अंबिका दोरनाल, पूजा आकेन, रेखा रासकोंडा, लता रासकोंडा, लावण्या सिंगराल, शारदा हडलगी या महिला करीत आहेत.

शेट्टी कुटुंबीयांच्या मूर्ती पेणला रवानामाधवनगर परिसरातील जगन्नाथ आणि रघुनाथ शेट्टी यांच्याकडील २५० गणेश मूर्ती पेणला रवाना झाल्या आहेत. पेणचे गणपती संपूर्ण महाराष्टÑात प्रसिद्ध आहेत. तेथून सोलापूरच्या मूर्तींनाही मोठी मागणी असते. आणखी काही मूर्ती पाठविण्यात येणार आहेत. शेट्टी कुटुंबीयांकडूनही विडी कामगार महिलांना प्रशिक्षण दिले जाते. पद्मावती, संजीवनी, रूपा, श्रावणी शेट्टी या महिला प्रशिक्षण देतात.

टॅग्स :SolapurसोलापूरTextile Industryवस्त्रोद्योगGaneshotsavगणेशोत्सव