शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
2
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
3
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
4
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
6
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
7
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
8
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
9
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
10
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
11
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
12
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
13
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
14
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
15
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
16
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
17
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
18
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
19
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
20
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले

मनोज जरांगे कोणाची सुपारी घेतायत? आम्हाला गोळ्या घालणार का?; राजेंद्र राऊत पुन्हा भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2024 2:31 PM

मनोज जरांगे यांच्या इशाऱ्यानंतर आता आमदार राऊत यांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार हल्लाबोल केला आहे.

MLA Rajendra Raut ( Marathi News ) : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्यात मागील काही दिवसांपासून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असून या वादाला आता आणखी धार आल्याचं पाहायला मिळत आहे. बार्शीतील एका मराठा तरुणाला मारहाण झाल्याचा आरोप होत असून या मुद्द्यावरून नुकतीच मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता राजेंद्र राऊत यांच्यावर टीका केली. तसंच यामध्ये तथ्य आढळल्यास आम्हीही प्रत्युत्तर देऊ आणि त्या तरुणाच्या अश्रूंचा बदला घेऊ, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला होता. जरांगे यांच्या इशाऱ्यानंतर आता आमदार राऊत यांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार हल्लाबोल केला आहे.

"जरांगे पाटील म्हणतात तसा कोणताही प्रकार माझ्या तरी माहितीत नाही. मात्र असं काही घडलं आहे का, याबाबतची माहिती मी घेतो. परंतु जरांगे पाटलांचं वक्तव्य ऐकून मला तर आश्चर्याचाच धक्का बसला. ते मला गोळ्या घालून माझी लेकरं रडवणार आहेत का? तशी सुपारी त्यांनी महाविकास आघाडीकडून घेतली आहे का? प्रत्येकला बघतो, मारतो, रडवतो अशा धमक्या ते देत आहेत. या महाराष्ट्रात लोकशाही आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान राहिलं आहे की नाही?" असा सवाल आमदार राजेंद्र राऊत यांनी विचारला आहे.

दरम्यान, "राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बार्शीत आधी दिलीप सोपल यांची भेट घेतली आणि नंतर त्यांची सभा झाली. त्यानंतरच आमच्या बार्शीत पेटवा-पेटवीचं राजकारण सुरू झालं आहे का, अशी शंका मला येत आहे," असा घणाघातही आमदार राऊत यांनी केला आहे.

जरांगे पाटील विरुद्ध राऊत संघर्ष

भाजपला समर्थन असलेले अपक्ष आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडीकडून लिहून घेण्याबाबत राऊत यांनी जरांगे पाटलांना आव्हान दिले होते. राजेंद्र राऊत म्हणाले होती की, 'माजलगावच्या सभेत तुम्ही म्हणाला राजेंद्र राऊतच्या घरासमोर सभा घ्यायला जागा आहे का पाहा, तुम्ही जर कोणाला मॅनेज होणार नसाल, महायुतीला पाडून महाविकास आघाडीला निवडून आणायचं पाप तुमच्या मनात नसेल तर तुम्ही महाविकास आघाडीकडून ओबीसीतून आरक्षण देण्याबाबतची भूमिका लिहून घ्या, देवेंद्र फडणवीस आणि महायुतीकडून भूमिका लिहून घ्यायची जबाबदारी माझी, त्यांनी लिहून दिलं नाही तर आमदार राजेंद्र राऊत राजकीय संन्यास जाहीर करेल', असं आव्हान राऊत यांनी जरांगे पाटील यांना दिले होते. त्यांनंतर जरांगे पाटील यांनीही प्रत्युत्तर दिलं होतं. 

दरम्यान, या वादानंतर बार्शी येथील मराठा बांधवांनी तब्बल ३०० गाड्याचा ताफा घेऊन शनिवारी अंतरवाली सराटी येऊन आमदार राजेंद्र राऊत यांच्याविषयी रोष व्यक्त केला. बार्शी येथे घोंगडी बैठक ठेवावी अशी विनंती बार्शी मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलbarshi-acबार्शी