४ भागात आणि १४ कॅटेगरीमध्ये एकूण १६०० गुणांची ही स्पर्धा होती. यात ८३० गुण मिळाले. यामध्ये शहरात केलेले वृक्षारोपण, जलसंवर्धनासाठी केलेले काम आदी कामाेचा समावेश आहे. राज्यातील ४३ शहरे होती, त्यात महापालिका आणि अ दर्जाच्या नगरपालिका यांचा समावेश होता, यामध्ये बक्षीस मिळवणारी बार्शी ही एकमेव नगरपालिका आहे. तर पुढील काळात पालिका आणखी चांगले काम या क्षेत्रात करेल असा विश्वास आमदार राजेंद्र राऊत यांनी यावेळी बोलताना व्यक केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरण विभागाच्या सचिव मनीषा म्हेसकर यांच्या हस्ते ऑनलाईन सन्मान सोहळ्यात हे प्रमाणपत्र देण्यात आले. नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले. यावेळी आमदार राजेंद्र राऊत, आरोग्यधिकारी ज्योती मोरे, प्रशासन अधिकारी शिवाजी कांबळे, नगर अभियंता भारत विधाते, आरोग्य सभापती संदेश काकडे, सभापती संतोष बारंगुळे उपस्थित होते.
----
शहरात तीन ठिकाणी ऑक्सिजन पार्क विकसित करण्यात आले आहेत. बागांचे पुनरुज्जीवन केले आहे. गणेश विसर्जनासाठी गणेश तलावात कुंड निर्मिती, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या विविध स्पर्धा आदी कामासोबत मॉर्निंग क्लब, जाणीव फाउंडेशन, वृक्ष संवर्धन समिती, भाऊसाहेब आंधळकर यांचे ट्रस्ट आदी सामाजिक संघटनेचे ही वृक्ष लागवडीसाठी योगदान दिले आहे.
----
फोटो : ०५ बार्शी नगरपालिका
अमृत गटात मिळाले उत्तेजनार्थ बक्षीस मिळाल्यानंतर आमदार राजेंद्र राऊत, आरोग्यधिकारी ज्योती मोरे, प्रशासन अधिकारी शिवाजी कांबळे नगर अभियंता भारत विधाते, आरोग्य सभापती संदेश काकडे, सभापती संतोष बारंगुळे आदी.
===Photopath===
050621\img_20210605_133439.jpg
===Caption===
माझी वसुंधरा अभियानात बार्शी नगरपालिका राज्यात चौथी