तालुक्यातील एकूण १५ कोविड केअर सेंटर आहेत. त्याची बेड क्षमता ही १४४७ आहे. त्यामध्ये सध्या केवळ १३३ पेशंट उपचार घेत आहेत, उर्वरित बेड रिकामे आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ केअरची संख्या ही १२ असून त्याची बेड क्षमता ही ३७२ आहे. यामध्येही केवळ ७३ रुग्ण उपचार घेत आहेत. उर्वरित २९९ बेड शिल्लक आहेत. डॉ. संजय अंधारे यांचे सुश्रुत हॉस्पिटल आणि जगदाळे मामा हॉस्पिटल या दोन्हीही हॉस्पिटलमध्ये बेड क्षमता ही १८० आहे. जगदाळे मामाचे ३९ बेड, तर अंधारेचे ४ बेड शिल्लक आहेत.
----
बार्शी तालुक्यात दोन्ही लाटेत मिळून शहरातील ८९७१, तर ग्रामीणमधील ९७७३ रुग्ण आहेत. त्यामध्ये १७ हजार ८४४ रुग्ण हे उपचारांनंतर बरे झाले. बरे झालेल्यांमध्ये शहरातील ८४७८ तर ग्रामीण भागातील ९३६६ जणांचा समावेश आहे. ४३१ जणांचा मृत्यू झाला. त्यात शहरातील २०४ व ग्रामीण भागातील २२७ जण आहेत. सध्या ४६९ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. यामध्ये शहरातील २८९ आणि ग्रामीण तालुक्यातील १८० रुग्णांचा समावेश आहे.
---
शहर व तालुक्यात ५४ हजार ४७६ जणांचे लसीकरण झाले आहे. यात ४१९८१ जणांनी पहिला तर १२ हजार ४९५ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.