यावेळी ह. भ. प. नवनाथ महाराज साठे, ह. भ. प. विलास पिंगळे महाराज, दत्तात्रय महाराज राऊत, संतोष सूर्यवंशी, धैर्यशील पाटील, संजय बारबोले, गणेश घोलप, पंकज शिंदे, आण्णा पेठकर, राणा देशमुख, रामभाऊ मस्के आदींसह भाविक उपस्थित होते. यावेळी उपस्थितांच्या हस्ते कलश, ध्वज व्यासपीठ, ग्रंथपूजन करण्यात आले. पहिल्या दिवशी गणेश गाढवे यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. १२ ते १९ फेब्रुवारीदरम्यान सुरू असलेल्या सप्ताहात ह. भ. प. अंकुश महाराज शिंदे, सागर महाराज कोल्हाळे, गिरीधर महाराज सामनगावकर, अनिकेत महाराज राऊत, रामेश्वर महाराज राऊत, नितीन महाराज जगताप, नवनाथ साठे महाराज यांची कीर्तनसेवा दररोज रात्री ८ ते १० या वेळेत होणार आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता शंकर महाराज बडवे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होईल.
याशिवाय दररोज सकाळी रामफेरी, भजन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम होतील. सूत्रसंचालन तुळशीदास मस्के यांनी केले. पंचक्रोशीतील भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. कार्यक्रमासाठी शिवपुत्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
फोटो
१२बार्शी-हरिनाम