यावेळी लोकमंगल बँकेचे संचालक शहाजी पवार, नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत, शिवशक्ती बँकेचे चेअरमन डॉ. प्रकाश बुरगुटे, ज्येष्ठ पत्रकार राजा माने, मुंबईचे उद्योजक सुरेश मजिठिया, आरसीएम ग्रुपचे सीएमडी राजेश मुकणे, शिवशक्ती बँकेचे गणेश बारगुळे, समाधान पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुशांत कादे, युवराज कादे, उपसरपंच कल्याण कादे, दत्ता घनवे, मधू गुरुजी, बाळासाहेब कादे, उद्योजक संतोष ठोंबरे, डॉ. सुनील पाटील, भगवंत पाटील, बाबा मोरे, युवराज ढगे उपस्थित होते.
सुभाष देशमुख म्हणाले, नव्याने सुरू केलेल्या कादे आणि करळे यांच्या के. के. मार्केटिंग कंपनीमुळे केवळ बार्शीच नव्हे तर आजूबाजूच्या तालुक्यासह मराठवाड्यातील छोट्या-मोठ्या व्यवसायिकांची एकाच ठिकाणी खरेदीची सोय होईल.
आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, कादे बंधूंनी बार्शीच्या उद्योग-व्यवसायात आपली स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे.
फोटो ओळी
०७बार्शी०१
बार्शीत के. के. मार्केटिंग कंपनीच्या शुभारंभप्रसंगी आ. सुभाष देशमुख, आ. राजेंद्र राऊत, राजेश मुकणे, सुरेश मजीठीया व अन्य.