पोलिसांनी वर्दळीच्या ठिकाणी शहरातील पोस्ट चौक, पांडे चौक, शिवाजी नगर, सुभाष नगर, तुळजापूर नाका या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. शहराची पोलिसांनी गस्त करून पाहणी केली. यावेळी शहरातील एक ज्वेलर्स दुकान उघडे असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्या दुकानावर कारवाई केली.
पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, फौजदार शिंदे, करनेवाड, ज्ञानेश्वर उदार, ननवरे, शामराव गव्हाणे, बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पथक, वाहतूक शाखा, होमगार्ड यांच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. नागरिकांनी हे आपले कुटुंब आपली जबाबदारी समजून देशातील राज्यातील कोरोना दूर करण्यासाठी मास्कचा वापर करावा. सॅनिटायझर वापरावे, सुरक्षित अंतर ठेवा, असे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी केले.
---