शेतकऱ्यांनी प्रयोगशील शेती करून नवनवे तंत्रज्ञान वापरून शेती पिकांच्या उत्पादनामध्ये जास्तीत जास्त वाढ करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन केले आहे. स्पर्धेत खरीप पिकांमध्ये ज्वारी, बाजरी, मका, भात, तूर, उडीद, सोयाबीन, मूग, भुईमूग, सूर्यफूल, मका तर रब्बी पिकांमध्ये ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ यांचा समावेश आहे.
स्पर्धेत सहभागी शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असणे व ती जमीन त्याने करणे गरजेचे आहे.
३१ डिसेंबर ही अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत आहे. स्पर्धेत सहभागी शेतकऱ्यांच्या पिकांची उत्पादकता ही तालुक्यातील इतर पिकांच्या उत्पादकते पेक्षा किमान दीडपट अधिक असेल तरच शेतकरी पुरस्कारासाठी पात्र समजला जाईल. तालुकास्तरीय स्पर्धेसाठी प्रथम ५ हजार, द्वितीय ३ हजार, तृतीय २ हजार रुपये अशी बक्षिसे दिली जाणार आहेत, असे शहाजी कदम यांनी सांगितले.