बावी गावची लोकसंख्या तीन हजार असून, दररोज पाच ते दहा रुग्ण पॉझिटिव्ह सापडत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने या गावातील नागरिकांची तपासणी करणे गरजेचे असून जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळतील त्यांना घरामध्ये न ठेवता गावामध्ये या रुग्णांसाठी कोविड सेंटर उभा करण्याचा ग्रामस्थांनी निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागाने जे पॉझिटिव्ह आढळतील त्यांना औषधोपचार व तपासणी करण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाला तर पतीच्या निधनानंतर पत्नीही पॉझिटिव्ह आल्यामुळे तिचाही मृत्यू झाला तर अन्य एका व्यक्तीसह तीन जणांचा दोन दिवसात मृत्यू झाल्यामुळे व बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे बावी हे गाव सध्या हॉटस्पॉटकडे वाटचाल करीत आहे.
----